नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जवळपास सर्वच फोनमध्ये, लॅपटॉप, कंप्यूटरमध्ये सुरक्षेसाठी पासवर्डची सोय असते. असे फार कमी हँडसेट असतील ज्याला पासवर्ड टाकलेले नसतील. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना लॅपटॉप आणि Computer ला पासवर्ड टाकणं गरजेचं वाटतं. परंतु अनेकवेळा युजर्सला (how to open Laptop and Computer without password) पासवर्ड लक्षात न राहिल्यानं गैरसोय होते. अशा वेळी पासवर्ड न टाकताच आपल्या लॅपटॉप किंवा Computer ला अनलॉक करता येऊ शकतं.
कसं कराल अनलॉक?
मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या लेटेस्ट विंडोज 10 व्हर्जनमध्ये without पासवर्ड साइन इन करण्याचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यात कोणताही पासवर्ड न टाकताही युजर्सला लॉगइन करता येणार आहे. या फीचरला विंडोज 11 होम इडिशनसाठीही जारी करण्यात आलं आहे.
या फीचरचा वापर कसा कराल?
युजर्सला हे फीचर वापरण्याआधी त्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट अकाउंट असायला हवं. त्यासाठी सर्वात आधी लॅपटॉपवर वेबपेज ओपन करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या (how to open laptop without password) अकाउंटवर लॉगइन करा.
यावेळी सेटिंगचा ऑप्शन ओपन होईल. त्यावर क्लिक करून सिक्योरिटीच्या पर्यायावर क्लिक करा. त्यातला पासवर्ड-लेस ऑप्शन ऑन करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड न टाकताही लॅपटॉप किंवा कम्प्यूटर ओपन करता येईल. त्यामुळे जर डिव्हाईसचा पासवर्ड युजर्सच्या लक्षात राहिला नाही, तरी या द्वारे लॅपटॉप किंवा Computer ओपन करता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.