नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : सोन्यात गुंतवणूक करण्याला भारतीयांची मोठी पसंती आहे. काळानुसार Gold Investment च्या पद्धतीत बदल झाले असले, तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही. कोरोना काळापासून इंटरनेटचा अधिक वापर सुरू झाला. आता सोन्याचीही ऑनलाइन खरेदी-विक्री होते. अशात डिजीटल गोल्ड गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरतो.
Digital Gold ची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात अगदी लहानसं सोनंही 1 रुपयासारख्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतं. दुकानातून फिजीकल गोल्ड खरेदी करताना ग्राहकांना ग्रॅमचा ऑप्शन मिळतो. ग्रॅममध्ये खरेदी करणं सर्वांनाच शक्य होत नाही. परंतु डिजीटल गोल्डमध्ये अधिकाधिक लोक आपल्या बजेटनुसार गुंतवणूक करू शकतात.
डिजीटल गोल्डची सुरक्षितताही फिजीकल गोल्डच्या तुलनेत अधिक असते. जोपर्यंत तुम्ही याची विक्री करत नाही, तोपर्यंत ते सुरक्षित आहे. काही प्लॅटफॉर्म डिजीटल गोल्डला फिजीकल गोल्डसाठी रिडीम करण्याचा पर्याय देतात. पॉप्युलर ई-कॉमर्स कंपन्या आता ग्राहकांना केवळ एका क्लिकवर डिजीटल गोल्ड खरेदीचा पर्याय देतात. यामध्ये Google Pay आणि PhonePe सारखे प्लॅटफॉर्म आहेत.
PhonePe वर कसं खरेदी कराल सोनं?
- सर्वात आधी PhonePe Account सेट करा.
- त्यानंतर स्क्रोल करुन Investment कॅटेगरीमध्ये जा.
- त्यानंतर Buy 24K Gold वर क्लिक करा.
- इथे गोल्ड कॉइन सिलेक्ट करा, जे तुम्हाला खरेदी करायचं आहे. किंवा जितक्या रुपयांचं सोनं खरेदी करायचं आहे, तितके रुपये टाकूनही त्या किंमतीनुसार सोनं घेता येईल. इथे केवळ 1 रुपयातही सोनं खरेदी करता येतं.
- त्यानंतर बँक अकाउंटमधून पेमेंट करा.
Google Pay द्वारे अशी करा सोनं खरेदी -
- Google Pay Account सेट करा आणि तुमचं बँक अकाउंट Add करा.
- त्यानंतर Buy Gold वर क्लिक करा. खरेदीसाठी अमाउंट एंटर करा. महत्त्वाची बाब म्हणजे हे गोल्ड तुम्ही कधीही विकू शकता.
डिजीटल प्लॅटफॉर्मवर सोनं खरेदी करताना, आधी त्या प्लॅटफॉर्मचे टर्म्स अँड कडिशन पूर्णपणे तपासूनच पुढील व्यवहार करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital services, Gold and silver prices today, The gold