मुंबई 3 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांतर माहित आहे की, सणासुदीच्या काळात बऱ्याच गोष्टींवर आपल्याला डिस्काउंट मिळतो. त्यात आता ऑनलाईन कंपन्या देखील ग्राहकांना कमीपैशात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स देत आहेत. आपला फायदा लक्षात घेत ग्राहक देखील आपल्याला लागणाऱ्या वस्तुंना ऑनलाईन मागवतात.
नुकतीच दिवाळी झाली आणि याच्या सुरुवातीला फोनवर अनेक ऑफर्स देखील दिल्या गेल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना MRP पेक्षा खूपच कमी किमतीत ते खरेदी करता येत होते, परंतु असं असलं तरी देखील यामुळे ग्राहकांची फसवणूक देखील होत असल्याचं समोर आलं आहे.
खरं तर, ग्राहक ज्या स्मार्टफोनची बुकिंग करत होते त्याची डिलिव्हरी त्यांना मिळत नव्हती, उलट काहीतरी दुसरीच गोष्ट त्यांना डिलिव्हरी होत होती ज्याची ग्राहकांना कल्पना नव्हती.
हे ही वाचा : विमानातून 33 हजार फूट खाली पडूनही ‘ती’ जिवंत राहिली, नक्की असं काय घडलं?
आम्ही तुम्हाला सांगतो की अनेक शॉपिंग साइट्सने ऑफर्सच्या नावावर मोठ्या प्रमाणात सूट देण्यास सुरुवात केली, परंतु जेव्हा स्मार्टफोनच्या डिलिव्हरीचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी ग्राहकांची फसवणूक केली. या वेबसाईटचे नाव उघड करु शकत नाही.
पण जेव्हा भरघोस डिस्काउंटनंतर ग्राहकांनी स्मार्टफोन मागवला, तेव्हा बॉक्स उघडताच ग्राहकांच्या संवेदना उडाल्या.
खरंतर या ऑफरमध्ये ग्राहकांना असे फोन मिळाले ज्या स्मार्टफोनला रिपेअर केलं गेलं आहे किंवा तो वापरलेला मॉडेल आहे आणि हे एक किंवा दोन ग्राहकांसोबत नाही तर डझनभर ग्राहकांसोबत घडले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा ग्राहक त्यांचे स्मार्टफोन उघडत होते तेव्हा त्यांच्यामध्ये काही प्रकारचे दोष असल्याचे त्यांना जाणवत होते, मग ते डिझाइनमध्ये काही प्रकारचे स्क्रॅच असो किंवा इतर कोणतीही कमतरता, परंतु हे स्मार्टफोन दोषपूर्ण होते आणि यामुळे बऱ्याच ग्राहकांनाकडून संताप व्यक्त केलं जात आहे.
स्मार्टफोन डिलिव्हरीदरम्यान अशा प्रकरणांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आता, लोक मोठ्या डिस्काउंटसह स्मार्टफोन खरेदी करणे टाळत आहेत आणि आम्ही तुम्हाला अलर्ट करू इच्छितो की जर तुम्हालाही अशी ऑफर कोणत्याही वेबसाइटवर दिसली तर प्रथम ती तपासणे आवश्यक आहे.
तसेच जर तुम्ही ऑर्डर करत असाल तर तुम्ही ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय निवडावा. ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची तपासणी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online shopping, Shocking news, Smartphone, Technology, Viral news