जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Banking Tips: चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत? घाबरू नका. अशा पद्धतीनं परत मिळतील पैसे

Banking Tips: चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत? घाबरू नका. अशा पद्धतीनं परत मिळतील पैसे

Banking Tips:  चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत? घाबरू नका. अशा पद्धतीनं परत मिळतील पैसे

जर चुकीने रक्कम चुकीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली तर तुम्हाला लवकर परत मिळू शकते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 01 नोव्हेंबर: सध्या पैशांचे बहुतेक सगळे व्यवहार ऑनलाईन (Online Transfer) होत आहेत. अगदी छोटीशी वस्तू, भाजी वगैरे खरेदी केली तरी ऑनलाईनचाच पर्याय सर्वांनाच सोपा वाटतो. खरेदीसाठी रोख रक्कम जवळ बाळगणं, सुट्टे पैसे ठेवणं ही एक कटकटच वाटू शकते. तर अगदी मोठ्या रकमेचे व्यवहार करतानाही ऑनलाईनलाच जास्त पसंती दिली जाते. ऑनलाईन पेमेंटमुळे (Online Payment) त्याची नोंदही व्यवस्थित राहते आणि पैसे पटकन जमा होऊ शकतात किंवा ट्रान्सफर केले जाऊ शकतात. त्यात अत्यंत गरजेच्या,घाईच्या वेळेस तर हा ऑनलाईनचा पर्यायच सोयीचा ठरतो. पण अनेकदा ही घाईच नडते. म्हणजेच काहीवेळेस घाईगडबडीत ट्रान्सफर केलेले पैसे चुकीच्या अकाउंटवर जमा होतात. लक्षात आल्यावर ते पैसे परत मिळवणं ही खरोखरीच अत्यंत वेळखाऊ आणि कटकटीची प्रक्रिया आहे. पण आता तुमच्याकडून जर चुकीने रक्कम चुकीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली तर तुम्हाला लवकर परत मिळू शकते. टीव्ही 9 नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आता तुमची रक्कम चुकीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली तर सर्वांत आधी तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाणं महत्वाचं आहे. ज्या अकाउंटमध्ये चुकीने रक्कम ट्रान्सफर झाली आहे त्या अकाउंटची माहिती बँकेमध्ये द्या. ज्या व्यक्तीचे ते खाते आहे त्याच्याशी संपर्क साधून त्याला याबद्दलची माहिती द्या. तुमच्याकडून ही रक्कम चुकीने त्या खात्यात ट्रान्सफर झाली आहे त्याचा काही पुरावा देता आला तर पैसे लगेचच परत मिळू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार (RBI Guidelines) जर तुमच्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय रक्कम काढली गेली आणि त्याबद्दल तीन दिवसांच्या आत तुम्ही बँकेत जाऊन याबद्दलची माहिती दिली तर तुम्हाला पैसै परत मिळू शकतात. आपली रक्कम चुकीच्या खात्यात गेली आहे हे आता ऑनलाइन अगदी लवकर समजू शकतं. अनेकदा त्या व्यक्तीचा नंबरही तिथे असतो. त्याच्याशी तुम्ही थेट संपर्क साधून बोलू शकता. PF Interest: पीएफचे व्याजाचे पैसे अजून आले नसतील तर इथे तक्रार करा घाईगडबडीत काही वेळेस कोणाकडूनही चूक होऊ शकते. पण पैसे ट्रान्सफर करताना या गोष्टी शक्यतो लक्षात ठेवा- १. ज्या अकाउंटमध्ये (Bank Accouunt) पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्याबद्दलची पूर्ण माहिती पुन्हा पुन्हा नक्की तपासून बघा. २. ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा अकाउंट नंबर अत्यंत काळजीपूर्वक भरा, पुन्हा तपासून बघा. ३. तुम्हाला याबद्दल काहीही संशय असेल, खात्री वाटत नसेल तर त्या अकाउंटमध्ये आधी थोडी रक्कम पाठवून बघा. ती योग्य व्यक्तीला मिळाली तरच पुढची रक्कम पाठवा. इतकी काळजी घेऊनही जर तुमची रक्कम चुकीच्या अकाउंटमध्ये पाठवली गेली तर त्याची माहिती तुम्हाला लगेचच मिळू शकते. तो अकाउंट नंबर किंवा IFSC कोड चुकीचा असेल तर काही वेळाने तुमच्या खात्यात पैसे परत येतात. मात्र २४ तासांत पैसे परत आले नाहीत तर बँकेत जाऊन मॅनेजरला भेटून याबद्दलची माहिती देणं आवश्यक आहे. ज्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले गेले आहेत त्या व्यक्तीनं जर पैसे परत द्यायला नकार दिला तर त्याबद्दलचा अधिकृत पुरावा दाखवून तुम्ही त्या व्यक्तीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करु शकता. अशा प्रकारे पैसे परत न करणे हे आरबीआयच्या (RBI) नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे त्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात, पैसे पाठवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तंत्रज्ञानाच्या साथीनं अगदी वेळेत आणि सोयीस्कररित्या होऊ शकते हे खरं आहे. तरीही थोडीशी खबरदारी घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे सतर्क राहा, काळजी घ्या!

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात