• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • एक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; SBI कडून ग्राहकांना अलर्ट

एक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; SBI कडून ग्राहकांना अलर्ट

ट्विटरवरुन एसबीआयने या नव्या प्रकारच्या फ्रॉडची माहिती दिली आहे, ज्यात सायबर गुन्हेगार ऑनलाईन FD अकाउंटमधून पैसे गायब करत आहेत. त्यामुळे कोणीही आपले बँकिंग डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका, असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 एप्रिल : देशभरात कोरोना काळात डिजिटल व्यवहारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. डिजिटल व्यवहारांमुळे कामं अधिक सोपी आणि अधिक जलद होऊ लागली. घरबसल्याचं अनेक कामं यामुळे करता येतात. परंतु एकीकडे डिजिटल व्यवहारांत वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र ऑनलाईन बँकिंग फ्रॉडच्या संख्येतही वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक सिक्योरिटी फीचर्स आणि अलर्ट राहूनही बँकिंग फ्रॉड कमी होत नाहीत. फ्रॉडस्टर्स वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या मार्गांनी फ्रॉड करत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. SBI कडून ग्राहकांना अलर्ट - स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या लाखो ग्राहकांना तसंच सर्वसामान्यांना अलर्ट केलं आहे. सायबर गुन्हेगार, ग्राहकांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन फिक्स्ड डिपॉझिट ओपन करत आहेत. त्यामुळे कोणीही आपले बँकिंग डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका, असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. तुमच्या FD वर सायबर क्रिमिनल्सची नजर - SBI ने दिलेल्या माहितीनुसार, अशा कॉलपासून सावध राहा, जे SBI बँकेतून बोलत असल्याचं सांगत तुमच्याकडे पर्सनल डिटेल्स, आधार कार्ड, OTP, कार्ड नंबर, पासवर्ड अशा गोष्टींची मागणी करतील. SBI कधीही आपल्या कोणत्याच ग्राहकाकडून अशाप्रकारची माहिती मागत नाही. ट्विटरवरुन एसबीआयने या नव्या प्रकारच्या फ्रॉडची माहिती दिली आहे, ज्यात सायबर गुन्हेगार ऑनलाईन FD अकाउंटमधून पैसे गायब करत आहेत.

  (वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone)

  चुकूनही करू नका हे काम - SBI ने दिलेल्या माहितीनुसार, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत, ज्यात सायबर क्रिमिनल्सनी ग्राहकांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन फिक्स्ड डिपॉझिट बनवले आहेत. सर्वात आधी हे सायबर क्रिमिनल्स ग्राहकांचं FD अकाउंट बनवतात, ज्यात ते ग्राहकांच्या नेट बँकिंग डिटेल्सचा वापर करतात आणि काही पैसे ट्रान्सफर करतात. हे फ्रॉड करणारे SBI अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात आणि OTP मागतात. ज्यावेळी OTP मिळतो, त्यावेळी फ्रॉडस्टर्स सर्व पैसे अकाउंटमधून स्वत:ला ट्रान्सफर करुन घेतात. त्यामुळे अशा कॉल्सपासून सावध राहा. ओटीही किंवा कोणतीही खासगी माहिती शेअर करू नका.

  (वाचा - WhatsAppचे मेसेज वाचून रिप्लाय करतं हे App, तुमच्याकडेही असेल तर लगेच करा डिलीट)

  दरम्यान, SBI सात दिवसांपासून 10 वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.9 टक्क्यांपासून 5.4 टक्क्यांपर्यंत व्याज देते. सिनीयर सिटिजन्सला FD वर 0.5 टक्के अधिक व्याज मिळतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: