मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

खरंच! फक्त 4999 रुपयांमध्ये मिळतोय OnePlusचा हा तगडा स्मार्टफोन, ऑफर 10 ऑगस्टपर्यंत लागू

खरंच! फक्त 4999 रुपयांमध्ये मिळतोय OnePlusचा हा तगडा स्मार्टफोन, ऑफर 10 ऑगस्टपर्यंत लागू

खरंच! फक्त 4999 रुपयांमध्ये मिळतोय OnePlusचा हा तगडा स्मार्टफोन, ऑफर 10 ऑगस्टपर्यंत लागू

खरंच! फक्त 4999 रुपयांमध्ये मिळतोय OnePlusचा हा तगडा स्मार्टफोन, ऑफर 10 ऑगस्टपर्यंत लागू

OnePlus Amazon Offer: वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न Amazon Sale मध्ये पूर्ण होऊ शकतं. कंपनीचा OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध आहे.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 07 ऑगस्ट: स्मार्टफोनच्या जगात OnePlus स्मार्टफोन्सची स्वतःची वेगळी ओळख आहे. आपल्या अद्वितीय फिचर्स आणि डिझाइनसाठी वनप्लस लोकप्रिय आहे, परंतु किंमतीमुळं अनेकजणांना वनप्लसचे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. तुम्हीही जास्त किंमतीमुळे OnePlus फोन खरेदी करू शकत नसाल, तर तुमचं स्वप्न Amazon सेलमध्ये पूर्ण होऊ शकतं. वनप्लसचा प्रसिद्ध स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 Lite 5G  आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. कंपनीने एप्रिलमध्ये OnePlus X नंतरचा सर्वात स्वस्त डिव्हाइस म्हणून हा फोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन आता तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. जर तुमचं बजेट 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला OnePlus फोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी OnePlus Nord CE 2 Lite 5G हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीनं याची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये ठेवली आहे, परंतु तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन Amazon वरून 4999 मध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला, या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. OnePlus Nord CE 2 Lite 5G ऑफरचा तपशील- 10 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये (Amazon Great Freedom Festival Sale) Nord CE 2 Lite 5G वर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. ही सूट मिळाल्यानंतर 6GB+128GB मॉडेलची किंमत 18,999 रूपये होते. याशिवाय, तुम्ही नॉन-ईएमआय व्यवहारांसाठी एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे 1,000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता आणि ईएमआय व्यवहारांसह तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळू शकते. आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर OnePlus Nord CE 2 Lite 5G खरेदी केल्यावर मिळू शकणार्‍या सर्व ऑफरबद्दल सांगणार आहोत.
  • किमतीत 1,000 रुपयांची सूट
  • SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर (नॉन-ईएमआय) 750 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंट (किमान ऑर्डर मूल्य 5000 रुपये)
  • SBI क्रेडिट कार्ड व्यवहार (EMI) 1,250 रुपयांच्या झटपट सूटीसह (किमान ऑर्डर मूल्य रु 5000)
  • निवडक कार्डांवर 6 महिन्यांपर्यंत ईएमआयची किंमत नाही
  • प्राइम सदस्यांसाठी Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसह 5 टक्के कॅशबॅक
हेही वाचा- EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज म्हणजेच, जर तुम्ही SBI कार्ड नॉन-ईएमआय पेमेंटसह गेलात, तर तुम्हाला फोन 18,249 रुपयांना मिळू शकेल आणि ईएमआयसह तुम्हाला तो 17,749 रुपयांना मिळू शकेल. सर्व सवलतींचा विचार करता ही चांगली डिल ठरू शकते. एवढंच नाही तर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्ही 12,750 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळवू शकता. समजा तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाला तर फोनची किंमत रु. 4999 (17,749-12,750) असेल. परंतु एक्सचेंज बोनसचं मूल्य जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असतं हे लक्षात असायला हवं. OnePlus Nord CE 2 Lite 5G चे वैशिष्ट्य- OnePlus Nord CE 2 Lite 5G फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59-इंच IPS LCD सह येतो. Nord CE 2 Lite 5G मध्ये 16MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. मागील बाजूस, f/1.7 अपर्चरसह 64MP मुख्य कॅमेरा सेन्सर, 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सरसह 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे. आउट ऑफ द बॉक्स हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर चालतो.
First published:

Tags: Amazon, Oneplus, Smartphone

पुढील बातम्या