मुंबई, 6 ऑगस्ट: आजच्या काळात लोक खाजगी क्षेत्रात झपाट्यानं नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नवीन कंपनीत सामील होताना जुन्या UAN क्रमांकावरून नवीन पीएफ खातं सुरू होतं. मात्र, जुन्या कंपन्यांचा निधी नव्या पीएफ खात्यात जमा करता येत नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन खातं विलीन करावं (EPF Account Merge) लागेल. त्यानंतरच तुमची एकूण पीएफ रक्कम त्याच खात्यात दिसायला लागते.
UAN क्रमांक आहे आवश्यक -
ईपीएफओची दोन खाती एकत्र करण्यासाठी, तुम्हाला प्रथम ईपीएफओच्या वेबसाइटवर जावं लागेल. येथे तुम्ही सर्व्हिसेसवर (Services) जा आणि One Employee- One EPF Account वर क्लिक करा. यानंतर EPF खाते विलीन करण्याचा फॉर्म उघडेल. येथे पीएफ खातेधारकाला मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. यानंतर UAN आणि सध्याचा मेंबर आयडी टाकावा लागेल.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ठेवा सोबत-
जेव्हा तुम्ही सर्व तपशील भराल. त्यानंतर ऑथेंटिकेशनसाठी OTP जनरेट होईल. तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. ओटीपी क्रमांक टाकताच तुमचं जुनं पीएफ खातं दिसेल. नंतर पीएफ खातं क्रमांक प्रविष्ट करा आणि डिक्लेरेशन ओके म्हणून सबमिट करा. तुमची विलीनीकरण विनंती स्वीकारली जाईल. काही दिवसांच्या पडताळणीनंतर तुमचं पीएफ खातं विलीन केलं जाईल.
हेही वाचा- Flight Ticket: राडाच! फक्त 9 रूपयांत परदेश प्रवास, ‘या’ एअरलाइननं आणल्यात जबरदस्त ऑफर्स
UAN क्रमांक माहित असणे आवश्यक-
पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा UAN माहित असणं आवश्यक आहे. यासोबतच सक्रिय UAN असणं देखील आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला UAN माहित नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचं अनुसरण करून तुमचा UAN जाणून घेऊ शकता.
PF Balance तपासण्याची Online पद्धत-
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login ओपन करा. यानंतर आता UAN नंबर आणि पासवर्ड टाका. नंतर कॅप्चा कोड भरा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावरील ड्रॉप डाउन सूचीमधून तुमचा पीएफ क्रमांक निवडा. यानंतर पीएफ खात्याचा तपशील तुमच्यासमोर उघडेल. तुम्ही EPFO मध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करून तुमची PF शिल्लक तपासू शकता. पीएफ तपशील EPFO च्या संदेशाद्वारे उपलब्ध होईल.
पीएफच्या व्याजाचे पैसे-
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) जमा केलेल्या रकमेवर सरकारनं व्याजदर निश्चित केला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.01 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते. ऑगस्टमध्ये सरकार पीएफच्या व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकू शकेल, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.