• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • OMG! या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, भन्नाट AI फीचर्ससह मिळेल OnePlus Nord 2 5G

OMG! या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, भन्नाट AI फीचर्ससह मिळेल OnePlus Nord 2 5G

वनप्लस नॉर्ड टू (OnePlus Nord 2) हा 5G स्मार्टफोन आज, 22 जुलै 2021 रोजी बाजारपेठेत दाखल होत आहे. याआधीच्या नॉर्ड फोन्सप्रमाणेच या फोनचं लाँचिंगही अनेकांसाठी औत्सुक्याचं आहे

  • Share this:
मुंबई, 22 जुलै: वनप्लस नॉर्ड टू (OnePlus Nord 2) हा 5G स्मार्टफोन आज, 22 जुलै 2021 रोजी बाजारपेठेत दाखल होत आहे. याआधीच्या नॉर्ड फोन्सप्रमाणेच या फोनचं लाँचिंगही अनेकांसाठी औत्सुक्याचं आहे. हे लाँच लाइव्ह पाहण्यासाठी वनप्लस कंपनीच्या ऑफिशियल यू-ट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता. वनप्लसच्या वेबसाइटवर OnePlus AR experience zone लाही तुम्ही भेट देऊ शकता. यात AR Games खेळून तुम्ही OnePlus Nord 2 - 5G हा स्मार्टफोन आणि आणखीही अनेक गिफ्ट्स जिंकू शकता. हे खेळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवरचा सफारी किंवा क्रोम ब्राउझर वापरावा. OnePlus Nord 2 - 5G या स्मार्टफोनची फीचर्स स्पेशल AI फीचर्ससह नवा शक्तिशाली प्रोसेसर, ब्रँड न्यू कॅमेरा सिस्टीम आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या क्षमतेची बॅटरी ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्यं आहेत. या नव्या स्मार्टफोनच्या प्रसिद्ध झालेल्या काही छायाचित्रांतून डिझाइनबद्दलचे काही संकेत मिळत आहेत. वनप्लस नॉर्डच्या डिझाइनची वैशिष्ट्यं असलेल्या जेंटली कर्व्ह्ड एजेस आणि मेटॅलिक साइड्स याही फोनमध्ये आहेत. 6.43 इंची फुल एचडी, फ्लुइड AMOLED डिस्प्ले या फोनला देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. सर्वांत महत्त्वाचा अपडेट म्हणजे या फोनमध्ये SoC MediaTek Dimensity 1200-AI chip ही वैशिष्ट्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप आहे. हार्डवेअर अॅक्सलरेटेड एआय फीचर्सना ही चिप सपोर्ट करते. हे वाचा-48 MP कॅमेरासह Samsung चा बजेट फोन Galaxy M21 लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स हे AI फीचर OxygenOS 11 सह  नॉर्ड टू मध्ये काम करते. या फीचरमध्ये वेगवान इमेज प्रोसेसिंग, उत्तम स्टॅबिलायझेशन, अधिक पॉवरफुल नाइट मोड आणि उत्तम डिस्प्ले एक्स्पिरिअन्स आदींचा समावेश आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोअर CPU असून, 3 GHzचा एक Ultra performance ARM Cortex-A78 core, 2.6 GHzचा ARM Cortex-A78 performanceचे तीन कोअर्स आणि 2 GHz चे ARM Cortex-A55 efficiency चे चार कोअर्स अशा आठ कोअर्सचा समावेश आहे. याच्या जोडीला Mali-G77 MC9 GPUदेखील आहे. त्यामुळेच आधीच्या नॉर्ड फोनमध्ये असलेल्या Snapdragon 765G chip च्या तुलनेत या नव्या फोनमध्ये CPUचा परफॉर्मन्स 65 टक्क्यांनी, तर GPUचा परफॉर्मन्स 125 टक्क्यांनी वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. रॅम आणि स्टोरेज ऑप्शन अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाहीत; मात्र आधीच्या फोन्समधल्या सुविधा लक्षात घेता 6/64, 8/128 and 12/256 असे रॅम आणि स्टोरेज ऑप्शन्स असू शकतात. हे वाचा-YouTube मधून मिळेल घसघशीत कमाईची संधी, तुम्हाला करावं लागेल हे काम या नव्या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ब्रँड न्यू ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा , IMX 766 वर आधारित सेन्सरचा असून, मोठे पिक्सेल्स आणि OIS हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या पिक्सेल्समुळे कमी प्रकाशातले फोटो चांगले येऊ शकतील. अन्य दोन कॅमेराची स्पेसिफिकेशन्स कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाहीत. पण ते दोन कॅमेरे अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो या स्वरूपाचे असू शकतील. 4K ‘stacked’ HDR video साठी Dimensity 1200 सपोर्ट करत असल्यामुळे नॉर्ड 2 या मॉडेलमध्येही ती सुविधा असेल, अशी अपेक्षा आहे. बॅटरी किंवा चार्जरबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही; मात्र 4500 mAh क्षमतेची बॅटरी आणि 30 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये असावा, अशी अपेक्षा आहे.
First published: