Home /News /technology /

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर! OnePlus 9RT 5G भारतात उपलब्ध, सवलतीत खरेदी करण्याची संधी

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर! OnePlus 9RT 5G भारतात उपलब्ध, सवलतीत खरेदी करण्याची संधी

अत्याधुनिक स्मार्टफोनच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या वन प्लस (One Plus) या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीचा नवीन बहुचर्चित OnePlus 9RT हा फाइव्ह जी (5G) स्मार्टफोन भारतीय ग्राहकवर्गासाठी अ‍ॅमेझॉनवर (Amazon) उपलब्ध झाला आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 18 जानेवारी: अत्याधुनिक स्मार्टफोनच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या वन प्लस (One Plus) या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीचा नवीन बहुचर्चित OnePlus 9RT हा फाइव्ह जी (5G) स्मार्टफोन भारतीय ग्राहकवर्गासाठी अ‍ॅमेझॉनवर (Amazon) उपलब्ध झाला आहे. अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या (Amazon Great Republic Day Sale) माध्यमातून भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन दाखल करण्यात आला आहे. या सेलमध्ये या फोनवर घसघशीत सवलतही (Discount on one plus phone) देण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन फोन कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधीही ग्राहकांना मिळाली आहे. लवकरच हा फोन भारतात दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा 14 जानेवारी रोजी कंपनीनं केली होती. त्यानुसार 17 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅमेझॉनच्या सेलद्वारे हा फोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे वाचा-WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असणारा याचा बेस व्हॅरिएंट 42,999 रुपये किमतीचा असून, त्यापुढचा म्हणजे 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हॅरिएंट 49,999 रुपये किमतीला उपलब्ध आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना या फोनच्या किमतीवर 4000 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. आयसीआयसीआय (ICICI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) कार्डधारकांनाही 4000 रुपयांची सवलत आहे. त्याचबरोबर मासिक हप्त्याचा (EMI) पर्यायही उपलब्ध आहे. सेलमध्ये हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्पॉटिफायचं (Spotify) सहा महिन्यांचं मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळणार आहे. OnePlus 9RT मध्ये 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि HDR10+ सह 6.62-इंच फुल-एचडी AMOLED डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असून, तो 8 GB किंवा 12 GBच्या LPDDR5 रॅमसह आहे. यात ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लासची सुरक्षा आहे. हे वाचा-50MP कॅमेरासह Realme 9i बजेट Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स या स्मार्टफोनला ट्रिपल-कॅमेरा सेटअप (Triple Camera Setup) आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 16 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो यांचा समावेश आहे. 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनला 4500mAh ची बॅटरी असून, ती 65 वॅटच्या वार्प चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे केवळ 29 मिनिटांत म्हणजे अर्ध्या तासाच्या आत फोन पूर्ण चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. यूएसबी टाइप-सी कनेक्शन, वाय-फाय आणि थर्मल नियंत्रणासाठी एक मोठा हीट सिंक यात देण्यात आला आहे. हॅकर ब्लॅक (Hacker Black) आणि नॅनो सिल्व्हर (Nano Silver) अशा दोन रंगांमध्ये हे फोन उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये हा नवीन स्मार्टफोन उपलब्ध केल्याने वन प्लसच्या भारतीय चाहत्यांना सवलतीच्या दरात हा फोन खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आतुरतेनं या नवीन फोनची वाट पाहणारे 'वन प्लस'प्रेमी खूश झाले आहेत.
First published:

Tags: Amazon, Mobile

पुढील बातम्या