जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / OnePlus चा 'हा' स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

OnePlus चा 'हा' स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

OnePlus चा 'हा' स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

वनप्लस 10 प्रोच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये, OnePlus Bullets Wireless Z2 लाँच करण्याची शक्यता आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 31 मार्च :  आपल्याकडे एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेला फोन असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन विविध स्मार्टफोन (Smartphone) उत्पादक कंपन्या सातत्यानं आपल्या प्रॉडक्ट्समध्ये बदल करतात. गेल्या काही वर्षांपासून वनप्लसचे (OnePlus) स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आता वनप्लसनं आपल्या ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी आज (31 मार्च 2022) आपला वनप्लस 10 प्रो (OnePlus 10 Pro) लाँच करणार आहे. वनप्लस 10 प्रो हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन (Flagship Smartphone) आहे. या व्यतिरिक्त कंपनी आणखी दोन प्रॉडक्ट्स लाँच करण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार (Indian Standard Time) आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी वनप्लस 10 प्रोचा लाँचिंग इव्हेंट सुरू होणार आहे. हा कार्यक्रम वनप्लस इंडियाची (OnePlus India) अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत युट्युब चॅनेलवर (YouTube) पाहता येईल. या कार्यक्रमात तीन प्रॉडक्टस् लाँच केली जाऊ शकतात. वनप्लस 10 प्रो हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वांत शक्तिशाली स्मार्टफोन असेल. हा फ्लॅगशिप अँड्रॉईड स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी S22 प्लस (Samsung Galaxy S22 +) आणि आयफोन 13 (iPhone 13) या फोनसोबत स्पर्धा करेल. म्हणजेच फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना आता आणखी एक पर्याय मिळणार आहे, आज तक नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (हे वाचा- PHOTO: कतरिना कैफ-विकी कौशलचं रोमँटिक व्हेकेशन, एकमेकांमध्ये हरवलेले दिसले लव्ह बर्डस ) या नवीन फोनची बरीच फीचर लाँचिंगपूर्वीच उघड झालेली आहेत. वनप्लस 10 प्रो या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतात याची किंमत 60 हजार ते 65 हजार रुपयांदरम्यान असू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, त्याची वास्तविक किंमत अधिकृत लाँचिंगनंतर स्पष्ट होईल. ( 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची संधी; कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होणार भरती ) वनप्लस 10 प्रोच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये, OnePlus Bullets Wireless Z2 लाँच करण्याची शक्यता आहे. वनप्लसचे हे ईअरफोन नेकबँड स्टाइलसह मिळणार असून, त्याची किंमतही ग्राहकांना परवडणारी असू शकते. या व्यतिरिक्त, OnePlus Buds Pro TWS या ईयरबड्सचा सिल्व्हर व्हेरियंटदेखील या इव्हेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्याची किंमतदेखील रेग्युलर कलर व्हेरियंट प्रमाणेच असू शकते. एकूणच, वनप्लस गॅझेट्सचे चाहते असलेल्या ग्राहकांसाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात