बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ एयरपोर्टवर दिसून आले होते. दोघेही एकत्र एका सीक्रेट डेस्टिनेशनवर सुट्टी घालवण्यासाठी गेल्याच म्हटलं जात होतं.
या दोघांनी थेट लग्न करत सर्वांनाच चकित केलं होतं. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांनी डिसेंबरमध्ये शाही थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
या रोमँटिक कपलबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. नुकतंच विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक निसर्गरम्य फोटो शेअर केला आहे.
लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ लगेचच आपल्या कामावर परतले होते. दोघांच्याही हातात अनेक उर्वरित प्रोजेक्ट्स होते. त्यामुळे ते शुटींगवर परतले होते. त्यांनतर ते आपापल्या कामात व्यग्र होते.