मराठी बातम्या /बातम्या /करिअर /10वी पास उमेदवारांसाठी जॉबची संधी; कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होणार भरती; असं करा अप्लाय

10वी पास उमेदवारांसाठी जॉबची संधी; कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होणार भरती; असं करा अप्लाय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2022 - पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 एप्रिल 2022 असणार आहे.

मुंबई, 31 मार्च: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Mahanagarpalika KDMC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक परिचारिका प्रसविका (ANM) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहायक परिचारिका प्रसविका (ANM) - एकूण जागा 34

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक परिचारिका प्रसविका (ANM) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी ANM चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये विविध जागांसाठी भरतीची घोषणा; असा करा लगेच अर्ज

इतका मिळणार पगार

सहायक परिचारिका प्रसविका (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) , ता. कल्याण , जि. ठाणे

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील जलसंपदा विभागात रिटायर्ड उमेदवारांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख - 11 आणि 12 एप्रिल 2022

JOB TITLEKalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहायक परिचारिका प्रसविका (ANM) - एकूण जागा 34
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक परिचारिका प्रसविका (ANM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी ANM चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहायक परिचारिका प्रसविका (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताआचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) , ता. कल्याण , जि. ठाणे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Dombivali, Job alert, Kalyan