मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता WhatsApp आणखी सुरक्षित होणार, या नव्या फीचरमुळे असा होणार बदल

आता WhatsApp आणखी सुरक्षित होणार, या नव्या फीचरमुळे असा होणार बदल

त्यानंतर Business Tools वर टॅप करा.

त्यानंतर Business Tools वर टॅप करा.

अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपनं एक नवीन फीचर आणलं असून यामुळे तुमचा संपर्क नसलेल्या आणि कधीही चॅट न केलेल्या लोकांना तुमचं 'Last Seen' दिसणार नाही.

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : मेटा (META) या कंपनीच्या मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म (Instant Messaging Platform) असलेलं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)आता बहुतांश लोकांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कामकाजाशी संबधित लोक यांच्याशी स्मार्टफोनद्वारे मोफत संपर्क साधण्याची ही अतिशय साधी सुलभ सुविधा आहे. एकाचवेळी अनेक जणांचा समूह (Group) तयार करण्याची यात सुविधा आहे, त्यामुळे एकाचवेळी अनेकांना मेसेज करणं, फोन करणं, अगदी सोपं झालं आहे. यासाठी इंटरनेटचा खर्च सोडला तर दुसरा कसलाही खर्च येत नाही. त्यामुळे अगदी तरूणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वामध्ये व्हॉट्सअ‍ॅप अतिशय लोकप्रिय अ‍ॅप आहे. जगभरात कोट्यवधी लोक याचा वापर करत आहेत.

आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवीन फीचर्स (Features) आणत असतं. त्यामुळे त्याचा वापर अधिकाधिक सुरक्षित आणि सुलभ होतो. नवीन फीचर्समुळे नाविन्यपूर्ण सुविधा मिळतात. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपनं एक नवीन फीचर आणलं असून यामुळे तुमचा संपर्क नसलेल्या आणि कधीही चॅट न केलेल्या लोकांना तुमचं 'Last Seen' दिसणार नाही. यामध्ये तुम्ही या आधी कोणत्या वेळेला मेसेज पाहिला आहे हे दिसतं. व्हॉट्सअ‍ॅपने डिफॉल्टनुसार हे वैशिष्ट्य सेट केलं होतं. आता त्यात आणखी सुधारणा करण्यात आली असून आता व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं Last Seen पाहणाऱ्यांची संख्या मर्यादित करते.

व्हॉट्सअ‍ॅपने आता हे फीचर My Contact डिफॉल्ट सेट केलं आहे. यामुळे यापुढे तुम्ही ओळखत नसलेल्या म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या किंवा ज्यांच्याशी चॅट केलेलं नाही अशा लोकांना तुमचं 'Last Seen' पाहता येणार नाही. ही प्रक्रिया आता अधिक कठीण केली असून, यामुळे युजर्सची प्रायव्हसी अधिक जपणं शक्य होणार आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.

WhatsApp वर आक्षेपार्ह मेसेज आला? अशी करा तक्रार; फॉलो करा सोप्या स्टेप्स

लास्ट सीन म्हणजे एखाद्या युजरने व्हॉट्सअ‍ॅप शेवटचं मेसेज कधी पाहिला हे इतरांना दिसतं. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्या ग्रुपमधील किंवा एखाद्या व्यक्तीचा मेसेज रात्री 12 वाजता पाहिला असेल आणि त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप बराच वेळ बघितलं नाही किंवा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर या दरम्यानच्या काळात तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या लोकांना तुम्ही रात्री 12 वाजता व्हॉट्सअ‍ॅपवर उपस्थित होतात, हे कळेल. आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी हे एक चांगले फीचर असले तरी, अनेकांनी विशेषत: संपर्कात नसलेल्या लोकांनी याचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत.

WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन

अनेकदा लोक या फीचरचा वापर करून एखादी व्यक्ती ऑनलाइन आहे की नाही हे जाणून घेतात आणि विनाकारण मेसेज पाठवत राहतात. यामुळे या फीचरचा त्रासही अनेकांना झाला आहे. अर्थात व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासूनच असलेला Nobody हा पर्याय वापरून आपले 'लास्ट सीन' कोणीही बघू नये अशी सोय करता येणं शक्य आहे, मात्र आता या नवीन फीचरमुळे हे आणखी सुलभ झाले आहे.

WhatsApp वर काही सेकंदात डाउनलोड करा Covid-19 Vaccine Certificate, पाहा प्रोसेस

युजरला आपलं 'लास्ट सीन' काही लोकांपासून लपवायचं असेल तर या फीचरचा वापर करून ते शक्य होणार आहे. हे फीचर तुम्हाला तुमच्या संपर्कांमधील काही लोकांपासून तुमचं 'लास्ट सीन' लपवण्याची सुविधा देतं. मात्र संपूर्ण 'My Contact' लिस्टपासून ते लपवणं शक्य नाही. मात्र अनोळखी व्यक्तींपासून हे 'Last Seen' लपवणं आता शक्य होणार आहे. त्यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

First published:

Tags: Tech news, Whatsapp, Whatsapp New Feature