Home /News /technology /

आता WhatsApp द्वारे मिळेल PAN-Aadhaar चा अ‍ॅक्सेस, Digilocker बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा

आता WhatsApp द्वारे मिळेल PAN-Aadhaar चा अ‍ॅक्सेस, Digilocker बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा

MyGov ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स आता WhatsApp द्वारे MyGov Helpdesk वर डिजीलॉकर सेवांचा उपयोग करू शकतात. सरकारी सेवांपर्यंत लोकांची पोहोच सहज-सोपी करणं हा यामागचा उद्देश आहे.

  नवी दिल्ली, 29 मे : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी आणखी एक सुविधा आणली आहे. आता WhatsApp द्वारे डिजीलॉकर (DigiLocker) अॅक्सेस करता येऊ शकतं. MyGov ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स आता WhatsApp द्वारे MyGov Helpdesk वर डिजीलॉकर सेवांचा उपयोग करू शकतात. सरकारी सेवांपर्यंत लोकांची पोहोच सहज-सोपी करणं हा यामागचा उद्देश आहे. डिजीलॉकर (DigiLocker), डिजीटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उपक्रम आहे. याचा उद्देश लोकांना त्यांच्या डिजीटल कागदपत्रांच्या वॉलेटद्वारे खऱ्या कागदपत्रांमध्ये प्रवेश देणं हा आहे. डिजीलॉकर सिस्टममध्ये सुरक्षित ठेवलेले कागदपत्र मूळ खऱ्या कागदपत्रांप्रमाणे सरकारमान्य आहेत. WhatsApp वर मिळेल ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड - मिळालेल्या माहितीनुसार, नागरिक आता WhatsApp वर MyGov Helpdesk द्वारे डिजीलॉकर सेवांचा वापर करू शकतात. डिजीलॉकर WhatsApp वर MyGov द्वारे दिली जाणारी एक महत्त्वपूर्ण नागरिक सेवा असेल.

  हे वाचा - iPhone युजर्ससाठी WhatsApp ची घोषणा, हे मॉडेल वापरणाऱ्यांसाठी Alert

  9013151515 - या सेवांमध्ये डिजीलॉकर अकाउंट क्रिएट करणं आणि प्रमाणित करणं, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र असे कागदपत्र डाउनलोड करणं सामिल आहे. देशभरातील WhatsApp Users एका WhatsApp Number +91 901315151 वर Namaste किंवा Hi किंवा DigiLocker असा मेसेज करुन चॅटबॉटचा वापर करू शकतात.

  हे वाचा - Cyber Fraud: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी लिंकवर केलं क्लिक, महिलेला एक चूक पडली महागात; लाखोंचा गंडा

  MyGov चे सीईओ अभिषेक सिंह यांनी सांगितलं, की या उपक्रमाचा उद्देश WhatsApp च्या सहज उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देणं हा आहे. देशाला डिजीटल पद्धतीने सक्षम बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp features, WhatsApp user

  पुढील बातम्या