मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Chrome ब्राउझरला आता आणखी कडक सिक्योरिटी; युजर्सला असा होणार फायदा

Google Chrome ब्राउझरला आता आणखी कडक सिक्योरिटी; युजर्सला असा होणार फायदा

गुगल क्रोम ब्राउझर (Google chrome browser) आता युजर्ससाठी आणखी कडक सुरक्षा (Security) करण्याच्या तयारीत आहे.  ब्राउझरची सुरक्षा वाढवण्यासाठी क्रोम इंजिनिअर्सनी केलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे.

नवी दिल्ली, 3 मार्च : गुगल क्रोम ब्राउझर (Google chrome browser) आता युजर्ससाठी आणखी कडक सुरक्षा (Security) करण्याच्या तयारीत आहे. गुगल क्रोम लवकरच एचटीटीपीला (http) डिफॉल्ट रुपात वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी युजर्स एचटीटीपी (http) आणि एचटीटीपीएस (https) प्रीफिक्स लिहिण्यास विसरतात, त्यावेळी हे उपयोगी ठरणार आहे. ब्राउझरची सुरक्षा वाढवण्यासाठी क्रोम इंजिनिअर्सनी केलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे.

सध्या एखाद्या युजरने एखादी लिंक टाईप केल्यास, क्रोम अ‍ॅड्रेस बार (यूआरएल) , क्रोम प्रोटोकॉलची चिंता न करता टाईप केलेली लिंक लोड करतो. परंतु युजर्सनी प्रोटोकॉल न जोडल्यास, आता क्रोम प्रीफिक्स http जोडेल आणि http च्या माध्यमातून डोमेन लोड करण्याचा प्रयत्न करेल. क्रोम सुरक्षा इंजिनिअर एमिलि स्टार्कने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल क्रोम 90 मध्ये बदल असेल.

(वाचा - आता येतोय Apple चा फोल्डेबल iPhone; 8 इंची डिस्प्लेसह मिळणार पेन्सिल सपोर्ट)

Google ने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग आपोआप धोकादायक जाहिरातींपासून युजर्सचं संरक्षण करेल आणि धोकादायक साईट्सवर भेट देण्यापूर्वी किंवा संशयास्पद फाईल डाउनलोड करण्यापूर्वी युजर्सला इशारा देईल, यामुळे युजर्सला मोठा फायदा होणार आहे.

(वाचा - एलॉन मस्क यांच्या Starlink इंटरनेटसाठी भारतात बुकिंग सुरू; पाहा किती आहे चार्ज)

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही क्रोमचा वापर करत असाल, तर तुमची पासवर्ड सुरक्षा आपोआप इनबिल्ट असेल. ज्यावेळी युजर्स असुरक्षित http पेजवर पासवर्ड किंवा पेमेंट कार्ड डेटासह एखादी संवेदनशील माहिती शेअर करतील, त्यावेळी क्रोम युजर्सला असुरक्षिततेबाबत सावध करेल.

First published:

Tags: Google, Technology