जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / एलॉन मस्क यांच्या Starlink इंटरनेटसाठी भारतात बुकिंग सुरू; पाहा किती द्यावा लागेल चार्ज आणि काय असेल स्पीड

एलॉन मस्क यांच्या Starlink इंटरनेटसाठी भारतात बुकिंग सुरू; पाहा किती द्यावा लागेल चार्ज आणि काय असेल स्पीड

एलॉन मस्क यांच्या Starlink इंटरनेटसाठी भारतात बुकिंग सुरू; पाहा किती द्यावा लागेल चार्ज आणि काय असेल स्पीड

एलॉन मस्क यांची कंपनी Starlink मध्ये इंटरनेट सर्व्हिस मिळवण्यासाठी भारतात प्री बुकिंग सुरू झालं आहे. सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूसाठी ही बुकिंग सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 मार्च : माणसांना अंतराळात घेऊन जाणारी कंपनी SpaceX चे संस्थापक एलॉन मस्क यांनी आता भारतात इंटरनेट सर्व्हिस देण्याची तयारी सुरू केली आहे. एलॉन मस्क संपूर्ण जगभरात अनोख्या इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध आहेत. एलॉन मस्क यांची कंपनी Starlink मध्ये इंटरनेट सर्व्हिस मिळवण्यासाठी भारतात प्री बुकिंग सुरू झालं आहे. Starlink इंटरनेट सर्व्हिस एयरोस्पेस कंपनी SpaceX कंट्रोल करते. 2002 मध्ये एलॉन मस्क यांनी SpaceX ची स्थापना केली होती. Starlink ची अधिकृत वेबसाईट https://www.starlink.com/ वर इंटरनेटसाठी प्री-बुकिंग करता येणार आहे. सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूसाठी ही बुकिंग सुरू आहे. बुकिंगवेळी लोकेशनची माहितीही मिळणार आहे. 99 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयानुसार, जवळपास 7,270 रुपयांत प्री बुकिंग करता येणार आहे. कंपनीकडे जमा होणारी ही रक्कम रिफंडेबल आहे.

(वाचा -  64 मेगापिक्सलसह Samsung Galaxy A32 लाँच, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स )

- तुमच्या भागात ही सर्व्हिस उपलब्ध आहे की हे पाहण्यासाठी वेबसाईटवर तुमचं शहर आणि पिन कोड टाईप करुन माहिती घ्यावी लागेल. - भारतात, भारतीय युजर्ससाठी सॅटेलाईटद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी 2022 मध्ये उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

(वाचा -  ऑटोमध्येच थाटला संसार; आनंद महिंद्रांनीही PHOTO शेअर करत केलं कौतुक )

मिडिया रिपोर्ट्सनुसार, Starlink किटची सुरुवात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्ये 499 डॉलरपासून सुरू आहे. यात युजर्सला आवश्यक सामान वायफाय राउटर, पॉवर सप्लाय, केबल, माउंटिंग ट्रायपॉड मिळेल. Starlink युजर्सला हायस्पीड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. ज्यात 1 Gbps पर्यंत डाउनलोडिंग स्पीड आणि अपलोडिंग स्पीड असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात