नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशात कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरण मोहिम (Vaccination Drive) सुरू आहे. आता लसीकरणासाठी स्लॉट (Vaccination Slot) बुक करणं आणखी सोपं होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. कोरोना वॅक्सिन स्लॉट आता व्हॉट्सअॅपद्वारे बुक (WhatsApp Vaccination Book) करता येणार आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सअॅपद्वारे MyGovIndia Corona Helpdesk ला बुक स्लॉट लिहून पाठवल्यास वॅक्सिनेशन स्लॉट बुक होईल. त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 9013151515 वर व्हॉट्सअॅप करावं लागेल. त्यानंतर ओटीपी टाकून आपला स्लॉट बुक करावं लागेल. वॅक्सिनेशन स्लॉट बुक करण्यासाठी बुक स्लॉट लिहून पाठवावं लागेल, अशी माहिती WhatsApp कडून देण्यात आली. MyGovIndia Corona Helpdesk आता आपल्या प्लॅटफॉर्मवर मेसेजिंग अॅपच्या युजर्सला जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळवून देण्यासाठी आणि अपॉईंटमेंट बुक करण्याची सुविधा देईल. MyGovIndia आणि व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी चॅटबॉटवरुन वॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. संपूर्ण देशभरात 32 लाखहून अधिक सर्टिफिकेट डाउनलोड केले गेले आहेत.
Alert:एका चुकीने इंजिनिअरला हजारोचा फटका!त्याने केलेली चूक तुम्ही अजिबात करू नका
Paving a new era of citizen convenience.
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 24, 2021
Now, book #COVID19 vaccine slots easily on your phone within minutes.
🔡 Send ‘Book Slot’ to MyGovIndia Corona Helpdesk on WhatsApp
🔢 Verify OTP
📱Follow the steps
Book today: https://t.co/HHgtl990bb
तुमच्या कामाची बातमी! प्रवासाआधीच समजणार Toll ची किंमत, Google Maps चं भन्नाट फीचर
कोरोना हेल्पडेस्क मार्च 2020 पासून महामारीच्या काळात कोविड-19 संबंधी माहितीचा सर्वात महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरला. भारतातील 41 मिलियनहून अधिक युजर्ससाठी सार्वजनिक तसंच आरोग्यासंबंधी संकटाशी लढण्यासाठी MyGovIndia Corona Helpdesk ने एक महत्त्वाचं साधन म्हणून काम केलं आहे.