मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /केंद्रीय Pensioners साठी महत्त्वाची बातमी, तुमच्या खात्यात किती पैसे आले? आता WhatsApp वर मिळेल माहिती

केंद्रीय Pensioners साठी महत्त्वाची बातमी, तुमच्या खात्यात किती पैसे आले? आता WhatsApp वर मिळेल माहिती

केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना सांगितलं, की ते पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवू शकतात.

केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना सांगितलं, की ते पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवू शकतात.

केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना सांगितलं, की ते पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवू शकतात.

नवी दिल्ली, 25 जून : मोदी सरकारने पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासा दिला आहे. आता पेन्शन स्लिपसाठी (Pension Slip) बँकांमध्ये फेऱ्या मारव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions) पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना सांगितलं, की ते पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवू शकतात.

WhatsApp वर मिळेल माहिती -

WhatsApp द्वारेही पेन्शन स्लिप पाठवली जाऊ शकते. बँका यासाठी पेन्शनधारकांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करू शकतात, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने 62 लाख केंद्रीय पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सेंट्रलाईज्ड पेन्शन प्रोसेसिंग सेंटर्ससह (CPPCs) झालेल्या बैठकीत, पर्सनल डिपार्टमेंटने हे आदेश जारी केले आहेत. बँकांनी ही सेवा कल्याणकारी उपक्रम म्हणून विचारात घ्यावी, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

(वाचा - Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर)

Ease of Living अंतर्गत सर्विस -

पेन्शन पे स्लिपची (Pay Slip) इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासह महागाई भत्ता, DA, DR Arrear, Dearness relief सारख्या गोष्टींसाठी आवश्यकता लागते. केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या ईज ऑफ लिव्हिंगअंतर्गत (Ease of Living) ही सर्विस देण्याचं सांगितलं आहे.

(वाचा - Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक)

मासिक पेन्शनची माहिती -

बँका या कामासाठी WhatsApp सारख्या सोशल मीडिया टूलची मदत घेऊ शकतात, असं केंद्राने म्हटलं आहे. सरकारच्या आदेशानुसार, Pension Slip मध्ये मासिक पेन्शनचे संपूर्ण डिटेल्स असावेत. जर टॅक्ससंबंधी काही कपात असेल, तर ती माहितीदेखील स्लिपमध्ये असावी. तसंच किती रक्कम पेन्शन अकाउंट देण्यात आली, हेदेखील Pension Slip मध्ये असावं, असंही सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Pension, Pensioners, Whatsapp