मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता AI नेच भविष्यात होणाऱ्या आजारांबाबत मिळणार माहिती, अभ्यासातून खुलासा

आता AI नेच भविष्यात होणाऱ्या आजारांबाबत मिळणार माहिती, अभ्यासातून खुलासा

माणसाला भविष्यात काय आजार होऊ शकतील याचा अंदाज बांधू शकणारी एक प्रणाली अमेरिकेतील शास्रज्ञांनी विकसित केली आहे.

माणसाला भविष्यात काय आजार होऊ शकतील याचा अंदाज बांधू शकणारी एक प्रणाली अमेरिकेतील शास्रज्ञांनी विकसित केली आहे.

माणसाला भविष्यात काय आजार होऊ शकतील याचा अंदाज बांधू शकणारी एक प्रणाली अमेरिकेतील शास्रज्ञांनी विकसित केली आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर : तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे आणि माणसाचं जगणं सुसह्य अधिक दर्जेदार होत आहे. माणसाला भविष्यात काय आजार होऊ शकतील याचा अंदाज बांधू शकणारी एक प्रणाली अमेरिकेतील शास्रज्ञांनी विकसित केली आहे.

    न्यूयॉर्कची स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोमधल्या (University at Buffalo) शास्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटिलिजन्स (Artificial Intelligence) तंत्रज्ञानावर आधारित एक प्रणाली विकसित केली आहे, जिच्या माध्यमातून रुग्णाचं वय वाढल्यावर त्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात याची माहिती त्याला आधीच कळू शकेल. ‘जर्नल ऑफ फार्माकोकायनेटिक्स अँड फार्माकोडायनेमिक्स (Journal of Pharmacokinetics and Pharmacodynamics)’ मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

    या मॉडेलमध्ये माणसाच्या शरीरातील चयापचय म्हणजे मेटॅबॉलिक (Metabolic) तसंच कार्डिओव्हॅस्कुलर (Cardiovascular) म्हणजे हृदयासंबंधी (arterial and cardiac) बायोमार्करचा (Biomarkers) वापर केला जाईल. यातील जैविक प्रक्रियेच्या (Biological process) माध्यमातून शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी (Cholesterol level), बॉडी मास इंडेक्स (Body mass index), ग्लुकोज (Glucose) आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) हे घटक किती आहेत हे कळेल आणि त्यावरून भविष्यात तब्येत कशी असेल याचा अंदाज बांधता येईल. संपूर्ण आयुष्यात एखाद्या व्यक्तीला कोणते आजार होऊ शकतात याचा स्पष्ट अंदाज वैज्ञानिक पद्धतीने बांधता येईल.

    Smoking : धुम्रपानामुळे होऊ शकतो हा गंभीर आजार, बरा होणेही शक्य नाही - संशोधन

    या आर्टिफिशियल इंटिलिजन्स (Artificial Intelligence) मॉडेलच्या माध्यमातून माणसाचं वय वाढल्यानंतर त्याच्या चयापचय आणि श्वसन यंत्रणेशीसंबंधित आजारांची जोखीम आधीच लक्षात येईल. माणसाच्या वाढत्या वयाचा त्याच्या शरीरातील पेशी, मानसिक स्थिती आणि व्यवहारांसंबंधी हालचालींवर विपरित परिणाम होतो.

    जाणकार काय म्हणतात?

    युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोमधील (University at Buffalo) स्कूल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्स (School of Pharmacy and Pharmaceutical Sciences) मधील प्रोफेसर मुरली रामनाथन (Murali Ramanathan) म्हणाले, ‘या नव्या तंत्रज्ञानामुळे आम्ही कोणत्याही आजारपणाच्या विकासाचा क्रम अधिक व्यवस्थितपणे जाणून घेऊ शकू. तसंच भविष्यात जे आजार होतील असं लक्षात येईल त्यांना आधीच उपचार करायला बराच वेळ मिळेल.’

    ते म्हणाले, ‘अनेक क्लिनिकल थेरेपीच्या (clinical therapy) माध्यमातून रुग्णांना त्यांचा आजार वाढण्यापासून रोखता येईल. हे मॉडेलच्या माध्यमातून दीर्घावधिक क्रॉनिक ड्रग थेरेपीचा (long term chronic drug therapy) अंदाजही बांधता येईल, ज्यामुळे डॉक्टरांना डायबेटिस, हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या आजारांवर लक्ष ठेवणं शक्य होईल.’

    तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागलंय का? या सोप्या टिप्स करून पहा परिणाम

    आर्टिफिशियल इंटिलिजन्स काय आहे?

    आर्टिफिशियल इंटिलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे एका मशीनमध्ये विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणारं तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटिलिजेन्स हे कॉम्प्युटर सायन्सचं सर्वांत विकसित रूप मानलं जातं. यात एक असा कृत्रिम मेंदू तयार केला जातो, ज्यात कॉम्प्युटर विचार करू शकतो, म्हणजेच कॉम्प्युटरचा मेंदू जो माणसांसारखा विचार करू शकेल आणि निर्णय घेऊ शकेल.

    First published:

    Tags: Artificial intelligence, Health