मुंबई, 09 डिसेंबर : जे सिगारेटला (cigarette) स्टेटस सिम्बॉल मानतात, त्यांनी या बातमीकडे जरूर लक्ष द्यावं. एका नवीन अभ्यासात हे समोर आलंय की, सिगारेटचा एक झुरकाही शरीरात अनेक अशा रोगांना आमंत्रण देऊ शकतो, ज्याबद्दल तुम्ही ऐकलंदेखील नसेल. साधारणपणे लोकांना वाटतं की, धूम्रपानामुळं कोणताही जीवघेणा आजार होत नाही. पण, धूम्रपानामुळेही प्राणघातक आजार होऊ शकतात, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. अभ्यासात असा इशारा देण्यात आलाय की, तुम्ही धूम्रपान सोडलं नाही तर तुमचं आरोग्य आणि सर्व जीवनमानच (smoking effect on lungs) बिघडण्याची शक्यता आहे. अभ्यासात असं म्हटलंय की, सिगारेटचा एक झुरकादेखील लाखो मुक्त रॅडिकल्स शरीरात तयार होण्याची संधी देऊ शकतो. यामुळं पेशींमध्ये जळजळ निर्माण होते. यानंतर, असे अनेक रोग उद्भवू शकतात, जे बरे करणंदेखील शक्य नाही. अभ्यासानुसार, धूम्रपानामुळं फुफ्फुसाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, क्रॉनिक ब्राँकायटिस, स्ट्रोक आणि हृदयविकार होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, भारतात धूम्रपानाच्या वाढत्या ट्रेंडमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या रोगानं (सीओपीडी - Chronic Obstructive Pulmonary Disease - COPD) ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. धुम्रपान न करणाऱ्यांचेही असे होते नुकसान HTK च्या बातमीनुसार, डॉक्टरांच्या मते, सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांनादेखील इतरांनी केलेल्या धूम्रपानामुळं त्रास सहन करावा लागतो. फोर्टिस हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अंशू पंजाबी यांनी सांगितलं की, सामान्यतः सीओपीडी ही एक सामान्य परंतु दीर्घकालीन समस्या आहे. यामध्ये पीडित व्यक्तीला श्वास घेणं कठीण होतं. मात्र, त्यावर वेळीच उपचार होऊ शकतात. सीओपीडीला एम्फायसेमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस (Emphysema and Chronic Bronchitis) असेही म्हणतात. COPD चे अनेक टप्पे असतात. हे वाचा - बॉसने दिलेली विचित्र चिठ्ठी वाचून हादरली तरुणी; पहिल्याच दिवशी सोडली नोकरी धूम्रपान करणार्याला अनेक टप्प्यांत रोगाचा सामना करावा लागतो रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार COPD चे चार टप्प्यांत विभागणी करता येते. पहिल्या टप्प्यात, रुग्णांना कळत नाही की, त्यांना कशामुळं त्रास होत आहे. यामध्ये सर्दी, खोकला आणि फ्लूसारखी लक्षणं दिसतात, ज्यावर रुग्ण उपचार घेतात. दुस-या टप्प्यात, खोकला खूप जास्त होऊ लागतो आणि श्लेष्मा जास्त प्रमाणात जमा होऊ लागतो. गंभीर प्रकरणांमध्ये, डॉक्टर स्टिरॉइड्स किंवा ऑक्सिजन थेरपीनं उपचार करतात. तिसऱ्या टप्प्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होते. या स्थितीत रुग्णाला वारंवार खोकला येतो. बोलता बोलता घशातून घरघर आवाज येतो. छातीत घट्टपणा आणि घोटा आणि त्याच्या आसपास पायावर सूज येते. चौथा टप्पा सर्वात धोकादायक आहे. यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते आणि हृदय आणि फुफ्फुस निकामी होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. हा टप्पा खूप धोकादायक आहे. यामध्ये शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण आदी वेळेवर न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हे वाचा - Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ सीओपीडी टाळण्याचे मार्ग ताबडतोब धूम्रपान सोडा. आवश्यक ती खबरदारी घ्या. धुळीचे कण श्वासनलिकेत जाण्याचं टाळण्यासाठी मास्क वापरा. फुफ्फुसांचं कार्य सुधारण्यासाठी, श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. नियमित आरोग्य तपासणी करा. नियमित व्यायाम करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.