Home /News /lifestyle /

Parenting Tips: तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागलंय का? या सोप्या टिप्स करून पहा परिणाम

Parenting Tips: तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागलंय का? या सोप्या टिप्स करून पहा परिणाम

Parenting Tips: मुलांना मोबाईलचे व्यसन लागणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचा केवळ आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही (Mental Health) परिणाम होत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे.

    मुंबई, 09 डिसेंबर :  आजकाल जवळपास प्रत्येक घरातील पालक मुलांच्या मोबाईल (Mobile) व्यसनामुळे त्रस्त आहेत. अगोदरच मुलांना मोबाईलवर वेळ घालवायला आवडत असताना कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली काही मुलं तासंन्तास मोबाईल घेऊन बसलेली असायची. मुलांना मोबाईलचे व्यसन लागणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचा केवळ आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही (Mental Health) परिणाम होत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. अगदी लहान वयातच त्याला प्रायव्हसी हवी असते. हे टाळण्यासाठी आपण काही टिप्स जाणून घेऊयात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईलपासून बऱ्याच अंशी (Parenting Tips) दूर ठेवू शकाल. DIY 'डू इट युवरसेल्फ' हा असाच एक विषय आहे, जो कोणत्याही वयोगटातील लोकांना आवडू शकतो. तुम्हालाही कला आणि हस्तकला करायला आवडत असेल, तर तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून मुलासोबत बसा आणि त्याला नवीन गोष्टी करायला शिकवा, त्याचप्रमाणे त्याचे मतही जाणून घ्या. यामुळे तुमचे मूल क्रिएटिव्ह होईल आणि मोबाईलपासून दूर राहील. इनडोअर गेम्स हिवाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर जाणे शक्य नसते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मुलांसोबत इनडोअर गेम्सचे नियोजन करू शकता. घरच्या घरी असे काही खेळ खेळा, ज्यामुळे त्यांची आवड वाढते आणि त्यात त्यांचा सहभाग असतो, काही खेळ ज्ञानाचेही असू शकतात, ज्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो. हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल मैदानी खेळ मैदानी खेळांसाठी मुलांना प्रवृत्त करणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला जाऊ द्या. त्यामुळे त्यांचा मित्रत्वाचा कल वाढेल. त्यामुळे तो अधिक अ‌ॅक्टीव देखील होईल. पुस्तके वाचायला द्या अनेक पालकांना वाटते लहान मुले पुस्तके कशी वाचणार? पण आजची पिढी ही नवी पिढी आहे. आतापासून जर तुम्ही तुमच्या मुलामध्ये पुस्तक वाचनाची सवय लावली तर ती तुमच्यासाठी आणि मुलासाठी फायद्याची ठरेल. हे वाचा - Career Tips: ‘या’ क्षेत्रांमध्ये सुरु करा स्वतःचं स्टार्टअप; डिग्रीपर्यंत शिक्षण घेण्याचीही गरज नाही कामावर मदत मिळवा कामात मुलांची मदत घेणे आपण टाळतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अजिबात काम करू देऊ नये. कपडे सुकवणे, ते उचलणे आणि व्यवस्थित ठेवणे, तुमचा स्वतःचा पलंग साफ करणे, तुमचे शूज साफ करणे, जेवणाच्या खोलीची पुनर्रचना करणे इत्यादी छोटी कामे तुम्ही मुलांना करायला लावू शकता. यामुळे पुढे तो स्वावलंबी बनतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Parents and child, School children

    पुढील बातम्या