नवी दिल्ली, 13 मार्च : जर तुमचा स्मार्टफोनचा सतत वापर असेल आणि फोनची बॅटरी सतत संपत असल्याची समस्या येत असल्यास, आता चिंता करण्याची गरज नाही. देशात पहिली स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्विस 'स्पाईक' (Spykke) लाँच झाली आहे.
8 हजार ठिकाणी कंपनीचं नेटवर्क -
संपूर्ण देशात 11 शहरांत 8 हजार ठिकाणी याचं नेटवर्क आहे. सध्या कंपनीचे आउटलेट बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, कोईंबतूर, चंडीगढ, लखनऊ, जयपूर आणि पुणे येथे आहे. एका आउटलेटमधून पॉवर बँक रेंटवर घेऊन दुसऱ्या आउटलेटवर ती रिटर्न करता येऊ शकते.
कमीत कमी ताशी 20 रुपये -
स्पाईकचे 3 रेंटल प्लॅन आहेत. स्टँडर्ड प्लॅनमध्ये 20 रुपये ताशी पैसे द्यावे लागतील. एलिट प्लॅनमध्ये 1199 रुपये वर्षभरासाठी भरावे लागतील. तर, सुप्रीम प्लॅनमध्ये 1999 रुपयांत लाईफटाईम मेंबरशिप मिळेल. या रेंटल सर्विसचा वापर करणाऱ्यांसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि पेटीएमचा उपयोग पेमेंटसाठी करता येऊ शकतो.
कोण आहेत पॉवर बँक रेंटल नेटवर्क 'स्पाईक'चे फाउंडर -
जस्टडायलचे (Justdial Ltd) सह संस्थापक रमणी अय्यर (Ramani Iyer) यांनी आपलं नवं वेंचर 'स्पाईक' लाँच केलं आहे. अय्यर 'स्पाईक'ला जगभरातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्विस कंपनी म्हणून स्थापित करू इच्छितात.
काही महिन्यातच कंपनीचं भारतात सर्वात व्यापक स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल नेटवर्क बनलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Phone battery