• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • WhatsApp चॅट डिलीट करण्याची गरज नाही; असे Hide करा तुमचे सिक्रेट मेसेज

WhatsApp चॅट डिलीट करण्याची गरज नाही; असे Hide करा तुमचे सिक्रेट मेसेज

व्हॉट्सॲपच्या या ट्रिकमुळे तुम्हाला तुमचे मेसेज डिलिट न करता लपवता येतात. यामुळे एखाद्या खास व्यक्तीशी तुम्ही केलेलं चॅट लपवणं शक्य आहे आणि जरी कुणी दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या फोनवरचं व्हॉट्सॲप ओपन केलं तरीही त्याला ते चॅट दिसणार नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 जून : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअपवर तुमचं सीक्रेट चॅट (Secret Chat) लपवायची सोयही आहे. व्हॉट्सॲपच्या या ट्रिकमुळे तुम्हाला तुमचे मेसेज डिलिट न करता लपवता येतात. यामुळे एखाद्या खास व्यक्तीशी तुम्ही केलेलं चॅट लपवणं शक्य आहे आणि जरी कुणी दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या फोनवरचं व्हॉट्सॲप ओपन केलं तरीही त्याला ते चॅट दिसणार नाही. Android युजर आपलं चॅट असं Hide करू शकतात - >> सर्वांत आधी WhatsApp ओपन करा आणि जे चॅट लपवायचं आहे त्यावर जा. >> ज्या व्यक्तीशी झालेलं चॅट लपवायचंय त्याचा कॉन्टॅक्ट किंवा चॅट उघडू नका पण त्या चॅट बॉक्सला लाँग प्रेस करून ठेवा. >> चॅट बॉक्स लाँड प्रेस केल्यानंतर एक फोल्डरचा आयकॉन दिसेल. >> त्या आयकॉनवर क्लिक केलं, की लगेचच त्या कॉन्टॅक्टशी तुम्ही केलेलं चॅट Archive होईल. >> ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर तो कॉन्टॅक्ट चॅट लिस्टमधून गायब होईल. व्हॉट्सॲप कितीही स्क्रोल केलंत तरीही तो कॉन्टॅक्ट दिसणार नाही.

(वाचा - तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 सरकारी Apps, हे आहेत फायदे)

iPhone युजर - >> WhatsApp मध्ये तुम्हाला जे चॅट लपवायचंय त्या चॅटबॉक्सवर जाऊन चॅट बॉक्सला उजवीकडे स्वाइप करा. >> त्यानंतर More आणि Archive हे पर्याय दिसतील त्यापैकी अर्काइव्हवर टॅप करा. >> Archive दाबल्यानंतर तो चॅट बॉक्स हिस्ट्रीतून गायब होईल.

(वाचा - ऑनलाईन फ्रॉड झाल्यास इथे करा तक्रार, गृह मंत्रालयाकडून Helpline नंबर जारी)

Archive केलेलं चॅट परत आणण्यासाठी - - Android युजर्स चॅट स्क्रीनच्या खालच्या भागात जा. - अर्काइव्ह चॅट्स टाइप करा. - जे चॅट तुम्हाला अनअर्काइव्ह करायचं आहे त्यावर लाँग प्रेस करा. - वर आलेल्या बारवर अनअर्काइव्ह हा पर्याय दिसेल त्यावर टॅप करा. तुम्ही लपवलेलं चॅट पुन्हा दिसेल. - iPhone युजरला अर्काइव्ह चॅटमध्ये जाऊन, जे चॅट अनअर्काइव्ह करायचं आहे त्यावर प्रेस करुन उजवीकडून डावीकडे स्लाइड करा. - स्क्रीनवर आलेला अनअर्काइव्ह पर्यायावर टॅप करा. तुम्ही लपवलेलं चॅट पुन्हा दिसू लागेल.
Published by:Karishma Bhurke
First published: