मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /वाहन चालकांना सरकारचा दिलासा! कार चालवण्याचा खर्च 35 लीटरपर्यंत कमी होणार

वाहन चालकांना सरकारचा दिलासा! कार चालवण्याचा खर्च 35 लीटरपर्यंत कमी होणार

आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. जिथे लोकांकडे पर्याय असेल, की 100 टक्के क्रूड ऑईलचा वापर करावा किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करावा.

आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. जिथे लोकांकडे पर्याय असेल, की 100 टक्के क्रूड ऑईलचा वापर करावा किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करावा.

आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. जिथे लोकांकडे पर्याय असेल, की 100 टक्के क्रूड ऑईलचा वापर करावा किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करावा.

नवी दिल्ली, 22 जून: केंद्र सरकारकडून लवकरच एक अशी घोषणा होणार आहे, ज्यामुळे तुमचा कार चालवण्याचा खर्च जवळपास अर्धा होणार आहे. पर्यायी इंधन इथेनॉलच्या वापराने हे शक्य होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री (Road and Transport Minister) नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुढील जवळपास 10 दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिनबाबत (Flex-Fuel Engines) मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचं इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी (Automobile Industry) अनिवार्य केलं जाईल. फ्लेक्स फ्यूलचा अर्थ Flexible Fuel म्हणजेच असं इंधन जे पेट्रोलच्या जागी इथेनॉलवरही चालवलं जाऊ शकतं. या पर्यायी इंधनाची किंमत 60 ते 62 रुपये प्रति लीटर असेल, तर पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटरहून अधिक आहे. यामुळे इथेनॉल इंधनावर कार चालवणं 40 टक्क्यांपर्यंत स्वस्त होईल, म्हणजेच जवळपास 35 रुपये लीटरपर्यंत बचत होईल.

Flex-Fuel Engines अनिवार्य होईल -

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं, कि या इंडस्ट्रीसाठी एक आदेश जारी करणार आहे. आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. जिथे लोकांकडे पर्याय असेल, की 100 टक्के क्रूड ऑईलचा वापर करावा किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करावा. येत्या 8 ते 10 दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

(वाचा - वाहनचालकांनो लक्ष द्या!Driving License आणि PUC सर्टिफिकेटबाबत ही अपडेट वाचली का?)

ब्राझिल, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्यूल इंजिनचं प्रोडक्शन करत आहेत. या देशात ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के इथेनॉलचा पर्याय देण्यात येत आहे. सध्या प्रति लीटर पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगची मंजुरी आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 1 ते 1.5 टक्के होतं. इथेनॉलची खरेदीही 38 कोटी लीटरवरुन 320 कोटी लीटरपर्यंत पोहचली आहे, असंही गडकरी म्हणाले.

(वाचा - Helmet वर ISI मार्क अनिवार्य, अन्यथा भरावा लागेल 5 लाखांचा दंड; जाणून घ्या काय आहे नियम)

पेट्रोलला चांगला पर्याय Ethanol -

इथेनॉल पेट्रोलहून अतिशय चांगलं इंधन आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे एक पाउल आहे. तसंच कमी खर्चातील, प्रदूषणविरहित आणि स्वदेशी असल्याचं गडकरींनी सांगितलं.

First published: