Home /News /technology /

Googleची नवी पॉलिसी, एक तारखेपासून लागू होणार 'हे' 5 नवीन नियम

Googleची नवी पॉलिसी, एक तारखेपासून लागू होणार 'हे' 5 नवीन नियम

गुगल (Google), अॅमेझॉन (Amazon) यांच्या बाबतीतले काही नवे नियम येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: गुगल (Google), अॅमेझॉन (Amazon) यांच्या बाबतीतले काही नवे नियम येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार असल्यानं त्याचा थेट परिणाम युझर्सच्या खिशांवर होणार आहे. मोबाईल युझर्सना (Mobile Users) अनेक सेवांसाठी ज्यादा पैसे भरावे लागणार असून, अॅमेझॉनवरून वस्तू मागवणे, ओटीटी अॅप्सचा वापर महाग होणार आहे. हे 5 नवीन बदल होण्यासाठी आता फक्त पाच दिवस उरले आहेत. त्यानंतर मोबाइल युझर्सच्या खर्चात वाढ होणार आहे. बनावट कंटेंटला प्रोत्साहन देणाऱ्या अॅप्सवर बंदी : गुगलने (Google) बनावट कंटेंटला (Fake Content) प्रोत्साहन देणाऱ्या अॅप्सवर बंदी आणणारे नवीन धोरण तयार केले असून, या नवीन नियमांबाबत गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे. आता 1 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरचे (Google Play Store) नियम पूर्वीपेक्षा कडक केले जाणार आहेत. डेव्हलपर्सनी जे अॅप (App) बऱ्याच काळापासून वापरले नाहीत ते ब्लॉक केले जाणार आहेत. यासोबतच गुगल प्ले स्टोअर,  गुगल ड्राइव्हसारख्या (Google Drive) सेवांचे नियमही बदलले जात आहेत. गुगल ड्राइव्ह युझर्सना 13 सप्टेंबर रोजी नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल. यामुळे त्याचा वापर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.

Alert! कधीही डाऊनलोड करू नका WhatsApp चे हे व्हर्जन, हॅक होईल तुमचा स्मार्टफोन

शॉर्ट पर्सनल लोन अॅप्सवर बंदी : 15 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरसाठी (Google Play Store) नवीन नियम लागू केले जात असून, याअंतर्गत कर्ज मिळवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या शॉर्ट पर्सनल लोन अॅप्सवर (Short Personal Loans App) भारतात बंदी घालण्यात येणार आहे. अशा 100 अॅप्सबद्दल तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर गुगलने अशा अॅप्ससाठी नवीन नियम आणले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टार महागणार : त्याचप्रमाणे मोबाइलवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप (Disney Plus Hot star) वापरणाऱ्या युझर्सना 1 सप्टेंबर 2021 पासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आता एक तारखेनंतर युझर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये द्यावे लागतील. तर 899 रुपयांमध्ये दोन फोनमध्ये याचा वापर करता येईल. 4 स्क्रीनसाठी 1,499 रुपये खर्च येईल. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन अधिक महाग होणार आहे.

कॉलिंग फिचरसह येतंय हे भन्नाट Smartwatch, 7 दिवस चालणार बॅटरी, किंमतही कमी

अॅमेझॉनवरून वस्तू मागवणंही महाग : 1 सप्टेंबरपासून अॅमेझॉनवरून (Amazon) वस्तू मागवणंही महाग होणार आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यानं अॅमेझॉन लॉजिस्टिक्स खर्च वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अमेझॉनवरून येणाऱ्या  500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये द्यावे लागतील. अमेझॉनवरून नियमित शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Amazon, Amazon subscription, Mobile Phone

पुढील बातम्या