Home /News /technology /

कॉलिंग फिचरसह येतंय हे भन्नाट Smartwatch, 7 दिवस चालणार बॅटरी, किंमतही कमी

कॉलिंग फिचरसह येतंय हे भन्नाट Smartwatch, 7 दिवस चालणार बॅटरी, किंमतही कमी

भारतीय बाजारपेठेत अलीकडेच Timex Fit 2.0 हे स्मार्टवॉच लॉन्च झालं आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, ब्लूटूथ कॉलिंग आदींसह स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवसांचा बॅकअप देईल.

पुढे वाचा ...
मुंबई, 26 ऑगस्ट : भारतीय बाजारपेठेत अलीकडेच Timex Fit 2.0 हे स्मार्टवॉच लॉन्च झालं आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, ब्लूटूथ कॉलिंग आदींसह स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवसांचा बॅकअप देईल, असा दावा कंपनीने केला आहे. या घड्याळाची डायल गोलाकार असून, तीन रंगांत हे घड्याळ उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक वॉच फेसेसही उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचची फीचर्स आणि किंमत आदींबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ या. टायमेक्सच्या Fit 2.0 या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग (Bluetooth Calling), म्युझिक कंट्रोल (Music Control) आणि पेअर्ड स्मार्टफोनच्या माध्यमातून रिमोट फोटोग्राफी (Remote Photography) आदी फीचर्स देण्यात आली आहेत. पांढरा, काळा आणि निळा अशा तीन रंगांत ही स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचच्या (Smartwatch) साह्याने आपला हार्ट रेट (Heart Rate), ब्लड ऑक्सिजन लेव्हल (Blood Oxygen Level), झोप (Sleep), ब्लड प्रेशर (Blood Pressure) आदी बाबींवरही लक्ष ठेवता येऊ शकतं. गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या संसर्गामुळे नागरिकांनी बारकाईने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठीच्या ऑक्सीमीटरची मागणी तर या काळात बरीच वाढली. कारण कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता त्या पातळीवरून कळते. तसंच ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्यांना कोरोना संसर्गामुळे जास्त धोका असतो. अशा स्थितीत स्मार्टवॉचमध्ये ही सारी फीचर्स देण्यात आल्यामुळे फायदा होणार आहे. 7 स्पोर्ट्स मोड (Sports Mode) या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर या स्मार्टवॉचची बॅटरी (Battery Backup) तब्बल आठवडाभर टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टवॉचला IP54 रेटिंग मिळालं आहे. याचाच अर्थ असा, की हे स्मार्टवॉच वॉटर रेझिस्टंट (Water Resistant) आणि डस्ट रेझिस्टंट (Dust Resistant) आहे. गोल डायलच्या या स्मार्टवॉचच्या उजव्या बाजूला नॅव्हिगेशनसाठी एक बटण देण्यात आलं आहे. स्क्रीनचा डिस्प्ले साइज किती आहे, याचा खुलासा मात्र कंपनीने अद्याप केलेला नाही. या स्मार्टवॉचची किंमत 5995 रुपये असून, सध्या तरी ते केवळ Timex च्या ऑफिशियल वेबसाइटवरच खरेदीसाठी उपलब्ध आहे. अन्य कोणताही ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन रिटेलर्सकडेही ते उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना हे वॉच खरेदी करायचं असेल, त्यांनी टायमेक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Published by:Shreyas
First published:

Tags: Smartwatch

पुढील बातम्या