जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Alert! कधीही डाऊनलोड करू नका WhatsApp चे हे व्हर्जन, हॅक होईल तुमचा स्मार्टफोन

Alert! कधीही डाऊनलोड करू नका WhatsApp चे हे व्हर्जन, हॅक होईल तुमचा स्मार्टफोन

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

तुम्ही WhatsApp युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्हाला एका नवीन आणि धोकादायक स्कॅमबाबत माहिती मिळेल. तुम्ही ही चूक केली तर तुमच्या फोनमधील डेटा धोक्यात येऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑगस्ट: तुम्ही WhatsApp युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्हाला एका नवीन आणि धोकादायक स्कॅमबाबत माहिती मिळेल. तुम्ही ही चूक केली तर तुमच्या फोनमधील डेटा धोक्यात येऊ शकतो. एका अहवालाच्या मते, WhatsApp च्या एका मॉडिफाइड अँड्रॉइड व्हर्जनबाबत माहिती मिळाली आहे. तुम्ही हे व्हर्जन डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाइलचा कंट्रोल तुमच्याकडे राहत नाही. मोबाइल हॅक करणाऱ्या या व्हर्जनबाबत सायबर सिक्योरिटी मेजर Kaspersky ने अहवाल दिला आहे. संशोधकांच्या मते,  WhatsApp चे हे मॉडिफाइड अँड्रॉइड व्हर्जन FMWhatsApp 16.80.0 आहे. या व्हर्जनला ट्रोजन ट्रायडा (Trojan Triada) प्रभावित करतो. जे काही फीचर्स तुम्हाला मुख्य व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत ते तुम्हाला या व्हर्जनमध्ये ऑफर केले जातात. त्यामुळे या फीचर्ससाठी तुम्ही हे व्हर्जन डाऊनलोड केलं तर तुमचा मोबाइल डेटा धोक्यात येऊ शकतो. हे वाचा- आता WhatsApp वर बुक करता येणार Corona Vaccination Slot, जाणून घ्या प्रोसेस Kaspersky च्या मते, FMWhatsApp या व्हर्जनमध्ये ट्रोजन ट्रायडा आहे. यासह अ‍ॅडव्हर्टायझिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) देखील आहे. अशावेळी Trojan या अफेक्टेड अ‍ॅपमधून तुमच्या डिव्हाइसमधून यूनिक डिव्हाइस आयडेंटिफायर्स जसं की डिव्हाइस आयडी, सब्सक्राइबर आयडी, MAC अ‍ॅड्रेसची माहिती मिळवू शकतो. हे वाचा- एकाच फोनमध्ये दोन WhatsApp Account वापरायचे आहेत? पाहा काय आहे प्रोसेस त्यानंतर ही संपूर्ण माहिती रिमोट सर्व्हरवर पाठवली जाते. सर्व्हरकडे माहिती पोहोचल्यानंतर डिव्हाइस रजिस्टर केलं जातं. या अहवालातील माहितीनुसार, FMWhatsApp तुमच्या डिव्हाइसमधील SMS वाचण्याची परवानगी देखील मिळवू शकतं. या अ‍ॅपला कोणतंही सिक्योरिटी चेक नाही. खऱ्या अ‍ॅपप्रमाणे यात डेटा सुरक्षित नाही. तसंच प्रायव्हसीबाबतही सुरक्षा मिळत नाही. दरम्यान यामुळे तुमच्या फोनमध्ये जर बँक डिटेल्स सेव्ह असतील तर तुमचं खातं देखील रिकामं होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात