Home /News /technology /

'या' मोबाईलमध्ये चालणार नाही Whatsapp, कंपनीने घेतला मोठा निर्णय

'या' मोबाईलमध्ये चालणार नाही Whatsapp, कंपनीने घेतला मोठा निर्णय

काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता Whatsapp हद्दपार होणार आहे. यामध्ये तुमच्या मोबाईलचा तर समावेश नाहीना हे एकदा चेक करून घ्या.

    मुंबई, 01 जानेवारी: सोशल मीडियामधील सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हेच व्हॉट्सअॅप 1 फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता Whatsapp हद्दपार होणार आहे. यामध्ये तुमच्या मोबाईलचा तर समावेश नाहीना हे एकदा चेक करून घ्या. अन्यथा तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही. सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया मेसेजिंग अॅप WhatsApp सातत्याने अपडेट देत असतं. त्यावरून मोठ्या प्रमाणावर मेसेज फॉरवर्ड केले जातात. कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिलं जातं. मात्र काही मोबाईलच्या मॉडेल्समधून व्हॉचट्सअॅप गायब होणार आहे. अॅप वापरणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे करणं आवश्यक असल्याचं कारण Whatsapp कंपनीकडून देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी आपल्या अॅपमध्ये अनेक वेगवेगळे फिचर्स आणि सिक्युरिटी अपडेट्स देत आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. 1 फेब्रुवारीनंतर एन्ड्रॉइड, आयइओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या काही ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती कंपनीने वेबसाइटवर दिली आहे. वाचा-ऑनलाइन फसवणुकीपासून फक्त 3 रुपयांत वाचू शकता, जाणून घ्या काय करायचं आयफोनच्या या मॉडेल्समधून होणार व्हॉट्सअॅप गायब 1 फेब्रुवारी 2020 पासून ios8 आणि त्याआधीच्या मॉडेल्समधील व्हॉट्सअॅप सुविधा बंद होणार आहे. आयफोन 6 आधीच्या सर्व मॉडेल्समधून ही सुविधा बंद करण्यात आली आहे. तर आयफोन 6 नंतरच्या मॉडेलमध्ये हायसिक्युरिटी असलेलं व्हॉट्सअप वापरण्यात येणार आहे. जुनं वर्जन वापरणाऱ्यांनी व्हॉट्सअॅपचं नवं वर्जन अपडेट केलं नसेल तर आताच करून घेण्याचं आवाहनही कंपनीकडून करण्यात येणार आहे. जुन्या अॅन्ड्रॉइडधारकांनाही कंपनीकडून आवाहन ज्यांचे टु जी फोन असलेले जुने अॅन्ड्रॉइड फोन आहेत अशा म्हणजेच 2.3.3 वर्जन असणाऱ्या ग्राहकांना whatsapp ची सुविधा उपलब्ध होणार नाही. विंडोज ऑपरेटींग सिस्टिमसाठी असा असेल नियम विंडोज मॉडेलच्या विचार करायचा झाला तर 8.1 आणि त्यानंतरच्या नव्या सर्व वर्जनसाठी whatsapp वापरता येणार आहे. त्याआधीच्या वर्जनसाठी ह्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या आधीही व्हॉट्सअॅपने 30 जून 2017 रोजी नोकीया S60, 31 डिसेंबर 2017 ब्लॅकबेरी आणि ब्लॅकबेरी 10च्या मॉडेलमधील व्हॉट्सअॅप बंद करण्यात आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅपनं युझरसाठी एक नवा पर्याय आणला आहे. व्हॉट्सअॅपने सुमारे चार वर्षांपूर्वी अॅपमध्ये व्हॉईस कॉलिंग फीचर सादर केले होते आणि आता कंपनीने त्यात एक मोठा बदल सादर केला आहे. व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड युझरसाठी कॉल वेटिंग हा नवीन फीचर आणले आहे. व्हॉईस कॉलिंगमध्ये युझरना, जेव्हा एक फोन चालू असताना दुसरा कोणताही कॉल दिसत नव्हता. मात्र आता कॉल वेटिंग असा पर्याय दिसणार आहे.उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा युझर व्हॉट्सअॅप कॉलवर असतो आणि दुसरा व्यक्ती कॉल करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत तो कॉलची प्रतिक्षा करताना दिसेल. यात तो कॉल वेटिंगवर ठेऊ शकतो किंवा दुसरा कॉल घेऊ शकतो. यासारखे whatsapp अनेक नवनवीन फिचर्स आणि सिक्युरिटी अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अफवा आणि चुकीच्या पद्धतीनं पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर करडी नजर ठेवणार असल्याचीही माहिती मिळत आहे. आधार-पॅन लिंकिंगची मुदत पुन्हा वाढवली, या तारखेच्या आधी करा लिंक
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Whatsapp

    पुढील बातम्या