Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर
ओप्पो, वीवो आणि शाओमी अँड्रॉइड फोनमध्ये अॅपलसारखी सुविधा मिळणार आहे. लवकरच या तीनही कंपन्या मिळून फाइल ट्रान्सफरसाठी फास्ट मोड फिचर तयार करणार आहेत.
|
1/ 5
स्मार्टफोन तयार करणाऱ्या ओप्पो, वीवो आणि शाओमी या कंपन्यांनी एक नवीन सुविधा युजर्सना देण्याची तयारी केली आहे. एका फोन मधून दुसऱ्या फोनमध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी फास्ट मोड या फीचरसाठी तीन कंपन्या एकत्र आल्या आहेत.
2/ 5
स्मार्टफोन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या या कंपन्यांनी ‘Peer-to-Peer Transmission Alliance’ या फीचरमधून अॅपलच्या Airdrop प्रमाणेच वेगाने फाइल ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली आहे.
3/ 5
फास्ट मोडमध्ये ओप्पो, वीवो आणि शाओमीच्या स्मार्टफोन्सना कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय 20 एमबी स्पीडने फाइल ट्रान्सफर करता येईल. जवळपास सर्व प्रकारच्या फाइल्स याद्वारे पाठवता येतील.
4/ 5
ब्लूटूथच्या माध्यमातून फाइल ट्रान्सफर करता येतील. सध्या ज्याप्रमाणे अॅपलचे युजर्स Airdrop वरून फाइल शेअर करतात तसेच या तीन कंपन्यांच्या फोनद्वारे फाइल पाठवता येतील.
5/ 5
तीन कंपन्यांचे मिळून असलेलं हे फीचर फेब्रुवारी 2020 मध्ये प्रत्यक्षात वापरता येईल. त्यानंतरच ते अॅपलप्रमाणे काम करते की नाही ते समजेल.