मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नवं Dating App लाँच; डेटिंगसोबतच मिळणार टिकटॉक व्हिडीओसारखी सुविधा, जाणून घ्या वैशिष्ट्यं

नवं Dating App लाँच; डेटिंगसोबतच मिळणार टिकटॉक व्हिडीओसारखी सुविधा, जाणून घ्या वैशिष्ट्यं

आणखी एका नव्या महिला मालक असलेल्या डेटिंग अ‍ॅपने मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे. 'स्नॅक' (Snack) असं या नवीन डेटिंग अ‍ॅपचं नाव आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेटिंगसोबतच व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकसारखी सुविधा देतं.

आणखी एका नव्या महिला मालक असलेल्या डेटिंग अ‍ॅपने मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे. 'स्नॅक' (Snack) असं या नवीन डेटिंग अ‍ॅपचं नाव आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेटिंगसोबतच व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकसारखी सुविधा देतं.

आणखी एका नव्या महिला मालक असलेल्या डेटिंग अ‍ॅपने मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे. 'स्नॅक' (Snack) असं या नवीन डेटिंग अ‍ॅपचं नाव आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेटिंगसोबतच व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकसारखी सुविधा देतं.

    नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : खास महिलांसाठी असलेल्या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप 'बंबल'ने (Bumble) आयपीओमध्ये (IPO) चांगला नफा कमवला. या ऑनलाइन अ‍ॅपद्वारे लोकांना त्यांचं प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आता आणखी एका नव्या महिला मालक असलेल्या डेटिंग अ‍ॅपने मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे. 'स्नॅक' (Snack) असं या नवीन डेटिंग अ‍ॅपचं नाव असून किंबर्ली कॅप्लान (Kimberly Kaplan) यांनी हे अ‍ॅप नुकतंच लाँच केलं आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेटिंगसोबतच व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकसारखी सुविधा देतं.

    टेक क्रंचच्या (Tech Crunch) वृत्तानुसार, हे अ‍ॅप टिंडर (Tinder) आणि बंबल (Bumble) यासारख्या डेटिंग अ‍ॅप्सवरील वापरकर्त्यांच्या वर्तणूकीवर आधारित होतं. डेटिंग अ‍ॅप 'प्लांट ऑफ फिश'मध्ये मार्केटिंग आणि रिव्हेन्यू टीममध्ये काम केलेल्या कॅप्लान यांच्या असं लक्षात आलं की, युजर्स विशेष करुन जनरेशन झेड (Gen Z) डेटिंग वेबसाइट किंवा अ‍ॅप्सवरील पार्टनर्ससोबत भेटतात. परंतु ते लवकरच आपला संवाद इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि स्नॅपचॅट या अ‍ॅपकडे वळवतात. त्या ठिकाणी ते व्यक्तीला फॉलो करतात.'

    (वाचा - क्या बात है! 15 वर्षाच्या मुलानं बनवलं whatsapp च्या तोडीचं भारतीय अ‍ॅप)

    कसं काम करतं हे अ‍ॅप?

    स्नॅक अ‍ॅपमध्ये इतर डेटिंग अ‍ॅपमध्ये असलेली सर्व वैशिष्ट्ये आहेत. फोटो अपलोड करण्याऐवजी स्नॅक युजर्स एखादा छोटा व्हिडीओ अपलोड करू शकतात. त्यामुळे स्थिर फोटोंना स्वाइप करण्याऐवजी स्नॅक युजर्स व्हिडीओच्या माध्यमातून संबंधित मेटीला (Matee) चेक करू शकतो. स्नॅक्स वेबसाइटच्या मते, व्हिडीओ पारदर्शकता आणि विश्वासाला बळ देतो. युजर्सला व्हिडीओ विविध मार्गांनी क्रिएटिव्ह करण्यास परवानगी दिली जाते.

    हे अ‍ॅप इतर डेटिंग अ‍ॅप्सपेक्षा वेगळं आहे कारण हे लोकेशन फीचर देत नाही. याचा अर्थ असा की मॅचेस आणि ऑप्शन्स (matches and options) दोघांना एखाद्या विशिष्ट भागातील असणं किंवा आवडीनिवडी सारख्याच असणं असं कुठलंही बंधन नाही. काहींना हे एक नकारात्मक असल्यासारखं वाटू शकतं. पण अ‍ॅप तयार करणार्‍यांचं असं मत आहे की, 'ते लोकेशन फिल्टर्सविना लोकांशी संवाद साधण्याची परवानगी देऊन लोकांसाठी पर्यायांना अधिक वैविध्यपूर्ण बनवत आहेत.'

    (वाचा - ...तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही;जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत)

    टिकटॉकद्वारे प्रेरित -

    स्नॅकच्या संस्थापक किंबर्ली कॅप्लानने न्यूज वीकला दिलेल्या माहितीनुसार, 'हे अ‍ॅप शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकपासून प्रेरित आहे. एक दिवस मी टिकटॉकवर व्हिडीओ स्क्रोल करत होते. यावेळी माझ्या फीडमध्ये प्रोफाइलसारखं पाहण्यास मी सुरुवात केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकं टिकटॉकवर डेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे अ‍ॅप त्यासाठी तयार केलं गेलं नाही.'

    दरम्यान, बंबल अ‍ॅपने आयपीओमध्ये चांगला नफा कमावला. आता बरेच उद्योजक संभाव्य हिट मनीमेकर म्हणून डेटिंग अ‍ॅपकडे पाहत आहेत. अशात आलेल्या स्नॅक या एका डेटिंगअ‍ॅपमध्ये इन्स्टाग्राम आणि टिकटॉकची वैशिष्ट्य असल्यानं ते अ‍ॅप ऑनलाइन डेटिंगच्या जगात स्वत:चा नवा ठसा उमटवू शकेल.

    First published:
    top videos

      Tags: Bumble, Dating app, Tech news, Technology, Tiktok, Tinder