नवी दिल्ली,16 मे : सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT) ट्रेंड वाढला आहे. नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेज शोज आणि चित्रपट पाहता येतात. या प्लॅटफॉर्म्सवरील कंटेंट पाहण्यासाठी याचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. अशात अनेकजण स्वत: सब्सक्रिप्शन न घेता एखाद्या दुसऱ्याचं नेटफ्लिक्स अकाउंट फ्रीमध्ये वापरतात. जर तुम्हीही असं करत असाल, नेटफ्किलक्स अकाउंट शेअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
नेटफ्लिक्स जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. मागील काही दिवसांपासून अशी चर्चा आहे, की नेटफ्लिक्स असं काही करणार आहे, की ज्यानंतर युजर्स आपल्या नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड आपल्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करू शकणार नाही. पण हा नियम कधीपासून लागू होणार?
सध्या नेटफ्लिक्सने अधिकृतपणे या नियमासाठी कोणतीही डेट जारी केली नाही. परंतु द न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार यावर्षाअखेरीस ऑक्टोबर 2022 पर्यंत नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग बंद करू शकतं.
युजर्सवर होणार असा परिणाम -
नेटफ्लिक्सने हा नियम लागू केल्यानंतर या युजर्सवर परिणाम होईल. हा नियम लागू झाल्यानंतर जर तुम्हीही एखाद्याच्या अकाउंटवर नेटफ्लिक्स पाहत असाल, तर अकाउंट होल्डरला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. त्यामुळे तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर न करणं फायद्याचं ठरू शकतं.
2022 च्या पहिल्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सने जवळपास 200,000 सब्सक्रायबर्स गमावले. असं मागील दहा वर्षात पहिल्यांदाच झालं. येत्या दोन महिन्यात नेटफ्लिक्स आणखी दोन मिलियनसब्सक्रायबर्स गमावू शकते. जवळपास 100 मिलियन युजर्स पासवर्ड शेअर करुन कंटेंट पाहत असल्याचं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे. त्यामुळेच नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर रोख लागण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.