नवी दिल्ली, 11 डिसेंबर : व्हिडीओ स्ट्रिमिंग पॉप्युलर कंपनी नेटफ्लिक्सने (Netflix) एक वेबसाइट लाँच केली आहे. ‘Tudum’ असं या वेबसाइटचं नाव असून या वेबसाइटवर एकाच ठिकाणी युजर्सला बातम्या, इंटरव्ह्यू, Behind the Scene Video आणि अनेक बोनस फीचर्स मिळतील. नेटफ्लिक्सबाबत युजर्सला अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर ही वेबसाइट तुमच्या कामाची असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. Tudum - नेटफ्लिक्सने नव्या वेबसाइटबाबत एक ट्विट केलं आहे. Tudum एक बॅकस्टेज पास आहे, ज्यात तुम्हाला नेटफ्लिक्स फिल्म्स, वेब सीरिज आणि तुमच्या आवडत्या कलाकारांना जवळून ओळखता येईल. सध्या हे सुरुवातीच्या टप्प्यात आहे परंतु तुम्ही स्पेशल इंटरव्ह्यू, पडद्यामागील व्हिडीओ आणि इतर काही गोष्टी पाहू शकता. Netflix ची ही नवी वेबसाइट जगभरात उपलब्ध आहे, परंतु सध्या ही केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. युजर्स या वेबसाइटवरुन नेटफ्लिक्सच्या कंटेंटबाबत अधिक माहिती मिळवू शकतात. उदा. Maid हा शो काय आहे, हा खऱ्या गोष्टीवर आधारित आहे का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी नेटफ्लिक्सच्या या वेबसाइटवर समजू शकतात. त्यामुळे नेटफ्लिक्स युजर्ससाठी ही वेबसाइट एक ट्रिट ठरू शकते.
चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं कसं ओळखाल? पाहा 5 सोप्या पद्धती
Netflix ने मागील महिन्यात आपल्या टॉप सीरिज आणि फिल्म्सच्या दर्शक संख्येबद्दल अधिक पारदर्शक होण्यासाठी सर्वात पॉप्युलर टीव्ही शो आणि चित्रपटांचा तपशीलवार रिपोर्ट प्रकाशित करण्यास सुरुवात करेल, असं सांगितलं होतं.
Say hello to Tudum — a backstage pass that lets you dig deeper into the Netflix films, series, and stars you love! It’s still early days but you can expect exclusive interviews, behind-the-scenes videos, bonus features, and more. Check it out https://t.co/sYnbZ6pTzF pic.twitter.com/WtCCAF3B9u
— Netflix (@netflix) December 9, 2021
दरम्यान, Video स्ट्रीमिंगमध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर Netflix ने गेमिंग क्षेत्रात उतरण्याचाही निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सन कंपनीने App मध्ये पाच नव्या गेम्सचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. मागच्या वर्षापासून (Netflix announces 5 new games) नेटफ्लिक्सवर या गेम्सचं टेस्टिंग सुरू होतं. आता Netflix ने नव्या पाच गेमच्या लॉन्चिंची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. यात युजर्सला गेमिंगचा (netflix game for free subscription) आनंद घेण्यासाठी वेगळ्या सब्सक्रिप्शन्सची गरज नसेल. युजर्ससाठी ही सुविधा मोफत असणार आहे. विशेष म्हणजे गेमिंगदरम्यान त्यात कुठल्याही जाहिरातींचा अडथळा येणार नाही. त्याचबरोबर गेंमिंगसाठी हिंदी, बंगाली, पंजाबी आणि मराठी भाषांचाही पर्याय देण्यात आला आहे. गेमिंगची सुविधा नेटफ्लिक्सने जगभरातील युजर्ससाठी जारी केली आहे.