नवी दिल्ली, 14 डिसेंबर : नेटफ्लिक्स इंडियाने (Netflix India) आपल्या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने हे पाऊल भारतील Amazon Prime आणि Disney+ Hot star ला टक्कर देण्यासाठी उचललं. कंपनीने आपल्या सर्व प्लॅनची किंमत कमी केली आहे, ज्यात Mobile Only प्लॅनही सामिल आहे. स्ट्रिमिंग दिग्गज नेटफ्लिक्सने मोबाइल प्लॅनची किंमत 149 रुपये प्रति महिना केली आहे, जी आधी 199 रुपये होती.
नेटफ्लिक्सचा प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांवरुन 649 रुपये करण्यात आला आहे.
मोबाइल प्लॅन 199 रुपयांवरुन 149 रुपये करण्यात आला आहे. तर बेसिक प्लॅन 499 रुपयांवरुन 199 रुपये करण्यात आला आहे. स्टँडर्ड प्लॅन 649 रुपयांवरुन 499 रुपये झाला आहे. तर प्रीमियम प्लॅन 799 रुपयांऐवजी आता 649 रुपये करण्यात आला आहे.
दुसरीकडे Amazon Prime प्लॅन प्रति महिना 129 रुपये आणि प्रीमियम सर्विससाठी 1499 रुपयांचा प्लॅन आहे.
मोबाइलसाठी Amazon Prime प्लॅन 499 रुपयांचा आहे. नेटफ्लिक्सच्या नव्या प्लॅनला ‘Happy New Prices’ चं नाव देण्यात आलं आहे. नवा प्लॅन 14 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
Prime मेंबरशिप 13 डिसेंबरपासून महाग झालं आहे. Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या गेल्या आहेत. नव्या प्राइज लिस्टनुसार, वर्षभराची प्राइम मेंबरशिप 500 रुपये महाग झाली आहे. म्हणजेच वर्षाचा प्राइम मेंबरशिप प्लॅन 999 रुपये होता, तो आता 13 डिसेंबरपासून 1499 रुपये आहे.
क्वॉर्टली मेंबरशिप प्लॅन ज्याची आताची किंमत 329 रुपये होती, तो प्लॅन 459 रुपये, तर महिन्याचा प्लॅन 129 रुपयांवरुन याचं सब्सक्रिप्शन 179 रुपये झालं आहे.
दरम्यान, व्हिडीओ स्ट्रिमिंग पॉप्युलर कंपनी नेटफ्लिक्सने (Netflix) एक वेबसाइट लाँच केली आहे. 'Tudum' असं या वेबसाइटचं नाव असून या वेबसाइटवर एकाच ठिकाणी युजर्सला बातम्या, इंटरव्ह्यू, Behind the Scene Video आणि अनेक बोनस फीचर्स मिळतील. नेटफ्लिक्सबाबत युजर्सला अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर ही वेबसाइट तुमच्या कामाची असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon subscription, Netflix, Tech news