मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /एका WhatsApp ग्रुपमुळे मोठ्या आर्थिक नुकसानापासून बचाव, मुंबई पोलिसांनी असा हाणून पाडला Cyber Fraud

एका WhatsApp ग्रुपमुळे मोठ्या आर्थिक नुकसानापासून बचाव, मुंबई पोलिसांनी असा हाणून पाडला Cyber Fraud

दोन कॉन्स्टेबलने बनवलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे (WhatsApp Group) मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.

दोन कॉन्स्टेबलने बनवलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे (WhatsApp Group) मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.

दोन कॉन्स्टेबलने बनवलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे (WhatsApp Group) मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : एकीकडे देशात डिजीटलायजेशन वाढत आहे, तसं सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणातही मोठी वाढ होत आहे. ऑनलाईन फ्रॉडमुळे आतापर्यंत अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. असंच एक प्रकरण मुंबईत समोर आलं, परंतु दोन कॉन्स्टेबलने बनवलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे (WhatsApp Group) मोठं नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहूमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीची मुलगी पोलिसांत तक्रार घेऊन आली. काही सायबर क्रिमिनल्सने त्या मुलीच्या वडिलांना जाळ्यात अडकवून त्यांच्या खात्यातून 75000 रुपयांची रक्कम लुटली होती. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांकडून क्रेडिट कार्ड डिटेल्स (Credit Card) फोनवरुन घेण्यात आले होते. तिच्या वडिलांनी 75000 रुपये आपल्या कॅन्सरच्या इलाजासाठी ठेवले होते. कार्ड ब्लॉक केलं जाण्यापूर्वीच सायबर क्रिमिनल्सने ऑनलाईन शॉपिंग करुन ही रक्कम उडवली होती.

या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) क्राईम ब्राँचकडे (Crime Branch) पोहोचले. त्यानंतर क्राईम ब्राँचने स्टॉप बँकिंग फ्रॉड (Stop Banking Fraud) नावाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपबाबत सांगितलं. हा ग्रुप चार वर्षांपूर्वी ग्वालियरच्या दोन कॉन्स्टेबलने बनवला होता. याच ग्रुपद्वारे त्या मुलीची पुढील पाच मिनिटांत मदत झाली.

क्राईम ब्राँच अधिकाऱ्यांनी मुलीच्या वडिलांचे कार्ड संबंधी डिटेल्स या ग्रुपवर टाकले. त्यानंतर काही वेळातच त्या ग्रुपमध्ये सामिल असलेल्या ई-कॉमर्स वेबसाईटच्या एका एक्जिक्युटिव्हने सायबर क्रिमिनल्सकडून केलेल्या शॉपिंगचं ट्रान्झेक्शन रोखलं. आता पोलिसांना ती रक्कम परत मिळवून देण्यासाठी केवळ एक ईमेल करावा लागेल. या ग्रुपमध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना जोडण्यात आलं आहे.

Shocking! विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा,अशी होतेय फसवणूक

ग्वालियर सायबर क्राईम एसपी सुधीर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रुप सायबर विभागाच्या दोन कॉन्स्टेबलने चार वर्षांपूर्वी बनवला होता. या ग्रुपमुळे सायबर फ्रॉड झाल्यानंतरही पैसे परत मिळत असल्याचं आश्वासन मिळतं. हा ग्रुप बनवणारे दोन कॉन्स्टेबल पुष्‍पेंद्र यादव आणि राधारमण त्रिपाणि यांच्यामुळे आतापर्यंत 15 कोटी रुपयांची रक्कम रिकव्हर करण्यात आली आहे. सायबर क्राईम प्रकरणात पैसे जाण्यापासून वेळेतच रोखणं महत्त्त्वाचं ठरतं. इतर औपचारिकता नंतर पूर्ण केल्या जाऊ शकतात. यात हा ग्रुप अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, हॅकर्स कधीच चोरी करू शकणार नाही तुमचा डेटा

स्टॉप बँकिंग फ्रॉड या व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये देशभरातील पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि 75 सेवा प्रदात्यांचे नोडल प्रतिनिधी आणि पाच प्रमुख पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्स जोडलेले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Mumbai police, Online fraud