• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Shocking! विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे

Shocking! विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे

सायबर क्रिमिनल्स स्वत:ला विमा पॉलिसी एजंट असल्याचं सांगत, लोकांना फोन करतात. विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या नावाने किंवा विमा पॉलिसी प्रीमियम शेअर मार्केटमध्ये लावून कमाई करण्याचं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

 • Share this:
  डेहराडून, 15 ऑगस्ट : कोरोना काळात सायबर क्राईममध्ये (Cyber Crime) मोठी वाढ झाली आहे. फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी, विविध पद्धतींचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत. आतापर्यंत ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) करत सायबर क्रिमिनल्सनी अनेकांना गंडा घातला आहे. सायबर क्रिमिनल्स स्वत:ला विमा पॉलिसी एजंट (Insurance Policy Agent) असल्याचं सांगत, लोकांना फोन करतात. विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या नावाने किंवा विमा पॉलिसी प्रीमियम शेअर मार्केटमध्ये (Share Market) लावून कमाई करण्याचं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात व्यक्तीचा आधार कार्ड नंबर, वोटर कार्ड नंबर विचारतात आणि त्यानंतर विविध बँकांमध्ये खातं उघडून बनावट नाव आणि पत्त्याने सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते. असंच एक प्रकरण डेहराडूनमध्ये समोर आलं आहे. एका महिलेने सायबर क्रिमिनल्सच्या (Cyber Criminals) जाळ्यात अडकून 2014 ते 2021 अशा सात वर्षांत 68 लाख रुपये गमावले आहेत. फ्रॉडस्टर्सनी विमा पॉलिसी आणि शेअर बाजाराच्या नावे वेगवेगळ्या हप्त्यात 68 लाख रुपयांचा गंडा घातला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजताच जुलै महिन्यात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करत सायबर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक केली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तसंच इतर आणखी किती जणांची अशाप्रकारे फसवणूक झाली, याचाही शोध सुरू आहे.

  Cyber Attacks पासून होईल बचाव, कंप्यूटर-मोबाईल वापरताना या गोष्टी लक्षात ठेवाच

  मिळालेल्या माहितीनुसार, हे सायबर क्रिमिनल्स अशा विविध साईट्सच्या संपर्कात आहेत, ज्यांच्याकडे लोकांच्या फोन नंबरसह इतरही माहिती आहे. या साईट्स या फ्रॉडस्टर्सला कमी पैशांत लोकांची माहिती देतात आणि लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं जातं. त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याची गरज असून कोणत्याही प्रलोभनांमध्ये न अडकता स्वत: प्रत्यक्ष शहानिशा करणं गरजेचं आहे.
  Published by:Karishma
  First published: