मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्यासोबत पैशांबाबत Fraud झाला? इथे मिळतील संपूर्ण पैसे, वाचा काय आहे प्रोसेस

तुमच्यासोबत पैशांबाबत Fraud झाला? इथे मिळतील संपूर्ण पैसे, वाचा काय आहे प्रोसेस

इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्ट ऑफिसने (Post Office) नवे फॉर्म काढले आहेत, ज्याद्वारे तुम्ही फ्रॉडबाबत तक्रार करुन आपल्या पैशांबाबत क्लेम करू शकता.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली,15 जुलै: कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. जर फ्रॉड झाला, तर तुमच्या पैशांबाबत आता चिंता करण्याची गरज नाही. एक तक्रार करुन तुमचे पैसे पुन्हा खात्यात येतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्ट ऑफिसने (Post Office) यासाठी नवे फॉर्म काढले आहेत, ज्याद्वारे तुम्ही फ्रॉडबाबत तक्रार करुन आपल्या पैशांबाबत क्लेम करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने Simplified Standardized Claim Form लाँच केला आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पैशांबाबत क्लेम करू शकता. कोणत्या खात्यासाठी कोण करू शकतं क्लेम? पोस्ट पेमेंट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकाचं पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे आणि त्यांच्यासोबत काही फ्रॉड झाल्यास ते क्लेम करू शकतात. त्याशिवाय कॅश सर्टिफिकेट, मनी ऑर्डर, SOP मध्ये फसवणूक झाल्यास ग्राहक क्लेम करू शकतात. आतापर्यंत पोस्ट ऑफिसच्या सर्व सर्कलचे लोक आपल्या हिशोबाने वेगवेगळ्या फॉर्मचा वापर करत होते, ज्याचा कंटेटही वेगवेगळा होता. हा फॉर्म संपूर्ण देशभरात समान करण्यासाठी आता हा नवा फॉर्म लाँच करण्यात आला आहे. Post Office च्या या स्कीममध्ये 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 20 लाख रुपये कशी कराल तक्रार? - तक्रार करण्यासाठी आधी फॉर्म भरावा लागेल. - त्यानंतर फॉर्म जमा करताना सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी द्यावी लागेल. - या फोटोकॉपीमध्ये Photo ID आणि Address Proof देणं गरजेचं आहे. - त्याशिवाय Passbook, Deposit Receipt द्यावी लागेल. - Original Passbook देखील जमा करावं लागेल. - त्यानंतर बँकेकडून तुमच्या तक्रारीचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल. फ्रॉडची तक्रार केल्यानंतर 7 दिवसांपासून ते 25 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तसंच फसवणूक कोणत्या प्रकारची आहे, त्यावरही वेळ ठरतो. Forensic Examination ची गरज असल्यास 3 महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो.
First published:

Tags: Financial fraud, Investment, Money, Money fraud, Online fraud, Post office bank, Post office saving

पुढील बातम्या