मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office च्या या स्कीममध्ये 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 20 लाख रुपये, पाहा कशी कराल गुंतवणूक

Post Office च्या या स्कीममध्ये 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 20 लाख रुपये, पाहा कशी कराल गुंतवणूक

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही योजना तुम्ही पोस्ट खात्याच्या मार्फत सुरू करू शकता. दररोज 150 रुपयांची बचत करून तुम्हाला 20 वर्षांनंतर 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड मिळू शकतो.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही योजना तुम्ही पोस्ट खात्याच्या मार्फत सुरू करू शकता. दररोज 150 रुपयांची बचत करून तुम्हाला 20 वर्षांनंतर 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड मिळू शकतो.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही योजना तुम्ही पोस्ट खात्याच्या मार्फत सुरू करू शकता. दररोज 150 रुपयांची बचत करून तुम्हाला 20 वर्षांनंतर 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड मिळू शकतो.

नवी दिल्ली,15 जुलै: आर्थिक बचत थोडी-थोडी करुन सतत करायला हवी आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. छोट्या बचतीतून मोठा फंड जमा करता येतो. सध्याच्या दिवसात बचतीचं महत्त्व सर्वांनाच पटलं आहे. छोट्या बचतीची एक सरकारी योजना आहे, ज्यात मोठी रक्कम जमा करता येते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही योजना तुम्ही पोस्ट खात्याच्या मार्फत सुरू करू शकता. दररोज 150 रुपयांची बचत करून तुम्हाला 20 वर्षांनंतर 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज 150 रुपयांची बचत करायला हवी.

कसे मिळतील 20 लाखांहून अधिक रुपये -

जर आता तुमचं वय 25 वर्षं असेल तर तुम्हाला छोटीशी गुंतवणूक करून मोठी रक्कम कमवण्याची सर्वोत्तम संधी उपलब्ध आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते जर तुमचा मासिक पगार 30 ते 35 हजार रुपये असेल तर सुरुवातीच्या काळात 100 ते 150 रुपयांची दररोजची बचत (Daily Saving) करता येऊ शकते. ही छोटीशी बचत तुम्हाला 45 व्या वर्षापर्यंत 20 लाख रुपयांचा फंड मिळवून देईल. जेणेकरून नोकरी करता करता तुम्ही तुमच्या इतर गरजा सहजपणे पूर्ण करू शकता.

- जर तुम्ही दररोज 150 रुपयांची बचत केली. तर महिन्याला ही रक्कम 4500 रुपये होते आणि वर्षाला ती 54 हजार रुपये होते. ही 54 हजार रुपयांची वार्षिक गुंतवणूक झाली.

- तसंच 20 वर्षांत एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये होईल. 7.1 टक्के कंपाउंड इंटरेस्टनुसार (Compound Interest) 20 वर्षांनंतर साधारणपणे 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड तयार झालेला दिसेल. तुमच्या या छोट्या गुंतवणुकीमुळे मोठा फंड मिळेल.

(वाचा - Post Office बँकेत खातं असेल तर 1 ऑगस्टपासून होणार हा बदल,मोजावे लागतील अधिक पैसे)

पीपीएफ अकाउंटचे हे आहेत फायदे

- हे अकाउंट उघडण्यासाठी कमीतकमी 100 रुपये भरावे लागतात. तुम्ही हे अकाउंट पोस्ट ऑफिसात (Bank or Post office) जाऊन उघडू शकता आणि पुढच्या महिन्यात त्यात पैसे टाकण्यासाठी महिनाभरात बचत करू शकता. हे अकाउंट तुम्हाला ज्वॉइंट पद्धतीनेही उघडता येतं.

- तुम्ही जेव्हा हे अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला वारसाचं नाव त्या अर्जामध्ये लिहायचं असतं. 15 वर्षांचा मॅच्युरिटी पिरेड (Maturity Period) पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 5-5 वर्षांसाठी दोन वेळा योजनेची मुदत वाढवू शकता. इथे सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत तुम्ही जे दरमहा 4500 रुपये भराल ते 15 वर्षांसाठी लॉक होतात म्हणजे तुम्ही ते 15 वर्षांनंतर काढू शकता. त्यापैकी काही टक्के रक्कम तुम्हाला 5 वर्षांनी मिळू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला महत्त्वाच्या खर्चांसाठी पैशांची गरज असेल तेव्हा पीपीएफ अकाउंटमधून पैसे काढता येत नाहीत. अकाउंट सुरू केल्यापासून किमान 5 वर्षं तुम्हाला पैसे काढता येत नाहीत.

- या योजनेत तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला सरकारचा कर भरावा लागत नाही त्यामुळे सगळी रक्कम टॅक्स फ्री (Tax Free Income) होते. अकाउंट ओपन केल्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षात या खात्यावर तुम्ही कर्ज काढू शकता. बँक, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला पीपीएफ अकाउंट उघडता येऊ शकतं. अकाउंट उघडल्यावर ही योजना 15 वर्षं चालते त्यानंतर तुम्ही 5 वर्षांसाठी दोन वेळा मुदत वाढवून घेऊ शकता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वर्षी तुम्हाला पैसे गुंतवणं जमलं नाही, तर आर्थिक वर्षात किमान एकदा 500 रुपये अकाउंटमध्ये भरावे लागतात. म्हणजे योजना सुरू राहते.

- सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दर आहे. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक कंपाउंड इंटरेस्ट पद्धतीने व्याज दिलं जातं. पीपीएफमध्ये कमीतकमी 100 रुपये भरून अकाउंट ओपन होतं. या योजनेत तुम्हाला एका आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते मार्च या काळात कमीतकमी 500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात.

कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे व्याजावर व्याज. त्यामुळे खूप फायदा होतो आणि टॅक्स फ्री उत्पन्न मिळतं ही या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता.

First published:

Tags: Post office, Post office saving