जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / डेटा सुरक्षेसाठी Facebook आणि Instagram ची मोठी कारवाई; लाखो Account वर बंदी घालत हटवला 'तो' कंटेंट

डेटा सुरक्षेसाठी Facebook आणि Instagram ची मोठी कारवाई; लाखो Account वर बंदी घालत हटवला 'तो' कंटेंट

डेटा सुरक्षेसाठी Facebook आणि Instagram ची मोठी कारवाई; लाखो Account वर बंदी घालत हटवला 'तो' कंटेंट

सोशल मीडिया कंपनी माहिती तंत्रज्ञान नियम 2021’ चे पालन करून, फेसबुकवरील 26.9 दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवरील 3.2 दशलक्ष कंटेंट काढून टाकण्यात आला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : आजकाल सर्वांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अगदी सहज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लाखो लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती अगदी क्षणार्धात सर्वत्र पसरू शकत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology) हा अविष्कार जितका फायद्याचा आहे तितकेच त्याचे तोटेही जाणवत आहेत. सोशल मीडियावर कोणाचं नियंत्रण नाही तसंच त्यावरील युझर्सची माहिती गोपनीय राहात नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत अनेकदा युझर्सकडून तक्रारी केल्या जातात. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (Social Media Platforms) आहेत. आपल्या देशात तर हे सर्व प्लॅटफॉर्म्स प्रचंड लोकप्रिय असून कोट्यवधी युझर्स आहेत. या प्लॅटफॉर्म्सकडून गोपनीयतेचा भंग होत असल्यानं देशाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने त्यांना कायदेशीर चौकटीत आणले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्म्सवर बंदी आहे. 15 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 108 कॅमेरा असणारा जबरदस्त Smartphone या सगळ्या पार्श्वभूमीवर, माहिती सुरक्षेबाबत या प्लॅटफॉर्म्सची मूळ कंपनी मेटाने (आधीची फेसबुक) (META) केलेल्या उपाययोजनांची नुकतीच माहिती दिली. युझर्सच्या डेटा सुरक्षिततेच्या (Data Security) दृष्टीने सप्टेंबरमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून 3 कोटीहून अधिक कंटेंट (Content) काढून टाकला असल्याची माहिती कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या मासिक अहवालात दिली आहे. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिलं आहे. ‘सोशल मीडिया कंपनी माहिती तंत्रज्ञान नियम 2021’ चे पालन करून, फेसबुकवरील 26.9 दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवरील 3.2 दशलक्ष कंटेंट काढून टाकण्यात आला आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःहून कारवाई करताना काढलेल्या कंटेंटचा तपशील या अहवालात आहे. यात युझर्सच्या तक्रारी आणि त्या तक्रारींवर केलेल्या कारवाईचा तपशीलही आहे,’ अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. Facebook चं नाव बदलल्यानं WhatsApp चं बदलणार लूक? WhatsApp वर काय होणार परिणाम? ‘आयटी नियमांनुसार 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 30 दिवसांच्या कालावधीसाठीचा आम्ही आमचा चौथा मासिक अहवाल (Monthly Report) प्रकाशित केला आहे. सप्टेंबरमध्ये, भारतात मेटाकडे 708 तक्रारी आल्या. कंपनीने त्या सर्वांना प्रतिसाद दिला असून, फेसबुकने 589 प्रकरणांमध्ये युझर्सच्या समस्या सोडवल्या आहेत,’ अशी माहितीही कंपनीने दिली आहे. मेटाने भारतात या प्लॅटफॉर्म्सवरून पसरलेल्या द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित 33,600 आणि नग्नतेशी संबंधित 5,16,800 कंटेंटवर कारवाई केली आहे. गुंडगिरी आणि छळवणुकीशी संबंधित 3,07,000 कंटेंटवरदेखील कारवाई केली आहे. तसंच व्हॉट्सअॅपने ऑगस्टमध्ये भारतात 20.7 लाख खात्यांवर बंदी घातली होती. 16 जून ते 31 जुलै या कालावधीत व्हॉट्सअॅपने भारतातील 30.2 लाख खात्यांवर नवीन आयटी नियमांचे पालन करून बंदी घातली आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात