नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) पुन्हा एकदा जगातील सर्वांत जास्त मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल मिळवणारी कंपनी ठरली आहे. ॲपल (Apple) कंपनीला मागे टाकत मायक्रोसॉफ्टने हे यश मिळवलं आहे. शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार सुरू झाला तेव्हा ॲपलचे शेअर 3 टक्क्यांहूनही खाली घसरले. या घसरणीमुळे ॲपल कंपनीची व्हॅल्यू 180.75 लाख करोड रुपये (2.41 ट्रिलियन डॉलर) इतकी झाली. काल रात्री ॲपलचा शेअर NASDAQ वर 3.46 टक्के घसरून 147.21 डॉलरवर ट्रेंड करत होता. तर दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft share price) शेअरमध्ये 1 टक्का वाढ पाहायला मिळाली. मायक्रोसॉफ्टचा शेअर 327.66 वर ट्रेंड करत होता. मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मार्केट कॅप (Microsoft Market Cap) आता 2.46 ट्रिलियन डॉलर आहे (जवळपास 186.75 लाख करोड रुपये ) यामुळे मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात श्रीमंत (Valuable) कंपनी बनली आहे. यावर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या स्टॉकमध्ये 45 टक्क्यांहूनही जास्त नफा पाहायला मिळत आहे. त्याचवेळेस ॲपलच्या शेअरमध्ये (apple stock price) मात्र 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
iPhone 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा काय आहे ऑफर
यापूर्वीही ॲपलला मायक्रोसॉफ्टनं टाकलं होतं मागे - मायक्रसॉफ्टने ॲपलला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकून सर्वोच्च स्थानावर पोहचली होती. मीडिया रिपोर्टनुसार 2020 वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत कंपनी बनली होती. ॲपलच्या कारभारावर सप्लाय चेनच्या संकटाचाही परिणाम दिसत असल्याचं आंतरराष्ट्रीय मार्केट तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मायक्रोसॉफ्टने क्लाऊड बिझनेसमध्ये मोठी झेप घेतली आहे. चौथ्या तिमाहीमध्ये iPhone च्या विक्रीमधून 47 टक्के वाढ झाली आहे. पण सप्लाय चेनवर परिणाम झाल्याने 6 अब्ज डॉलर रेव्हेन्यू मिळण्याचा अंदाज आहे असं ॲपलचे CEO टॉम कूक यांचं म्हणणं आहे.
Video Call केला आणि…; Google CEO Sundar Pichai यांच्याकडूनही झाली ‘ती’ चूक
दोन ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपचा आकडा पार करणारी मायक्रोसॉफ्ट ही ॲपल नंतरची दुसरी अमेरिकन कंपनी आहे. जून 2021 मध्ये मायक्रोसॉप्टने पहिल्यांदा 2 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप कंपनीचं स्थान मिळवलं होतं. आंतराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या या अमेरिकी कंपन्या कायमच एकमेकांशी स्पर्धा करत असतात. नवीन तंत्रज्ञान विकसित करून ते जगाला विकताना या कंपन्यांना मोठा नफा होतो. अमेरिकी शेअर बाजारातील त्यांच्या शेअरच्या मूल्यावर त्यांची किंमत ठरते आणि कोणती कंपनी श्रीमंत हे ठरतं. पण त्या परस्परांना प्रचंड कडवी स्पर्धा देतात.