Home /News /technology /

iPhone 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा काय आहे ऑफर

iPhone 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा काय आहे ऑफर

तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये खास संधी आहे. या सेलमध्ये तुमचा जुना फोन एक्स्चेंजही करू शकता.

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि खास करून iPhone घेणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म (Online Shopping) फ्लिपकार्टचा (Flipkart) दिवाळी सेल 27 ऑक्टोबर 2021 च्या रात्रीपासून सुरु झाला आहे. हा दिवाळी सेल (Diwali sale) 3 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन (Smartphone), लॅपटॉप (Laptop), स्मार्ट टीव्ही (Smart TV) आणि अन्य होम अप्लायन्सेस (Home Appliances) स्वस्त दरांत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये खास संधी आहे. iPhone ची किंमत किती? Flipkart च्या या दिवाळी सेलमध्ये iPhone 12 फक्त 49,999 रुपयांना मिळणार आहे. गेल्या सेलमध्ये याच फोनची किंमत 53 हजार 999 रुपये होती. तर गेल्या वेळच्या सेलमध्ये iPhone mini ची किंमत होती 42,099 रुपये होती. या फोनवर या सेलमध्ये आणखी अतिरिक्त सूटही देण्यात येत आहे. या सेलमध्ये तुमचा जुना फोन एक्स्चेंजही करू शकता. SBI च्या कार्डवर 10 टक्के सूट - एसबीआयच्या कार्ड्सवर (SBI Cards) ग्राहकांना जास्तीत जास्त 10 टक्के सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सेलफोनवर सर्वात जास्त म्हणजे जवळपास 80 टक्क्यांपर्यंत स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळतोय. या सेलमध्ये Xiaomi, Apple आणि Realme या कंपन्यांच्या स्मार्टफओन्सवर मोठ्या ऑफर्स आहेत.

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनJioPhone Next 1999 रुपयात;Relianceचं दिवाळी गिफ्ट

Oppo आणि Google च्या फोनवर सूट - ओपो रेनो 6 5G (Oppo Renno 6 5G) या फोनवर फ्लिपकार्टच्या या दिवाळी सेलमध्ये 16 टक्के डिस्काउंट दिला जातोय. त्यामुळे हा फोन 29,990 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर गुगल पिक्सल 4a (Google Pixel 4a) हा फोन 31,999 रुपयांऐवजी या सेलमध्ये 29,999 रुपयांना मिळतोय. iPhone घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अनेकजण यासाठी कित्येक दिसत पैसेही जमवत असतात. या सेलमध्ये तुलनेने स्वस्तात iPhone घेण्याची संधी आहे. जर तुम्हाला iPhone घेणं शक्य नसेल, तर Samsung, Xiaomi, Oppo चे फोनही घेऊ शकता. स्मार्टफोन आहे त्या किंमतीतहून अधिक स्वस्तात खरेदी करायचे असल्यास हा फ्लिपकार्टचा सेल नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone

पुढील बातम्या