नवी दिल्ली, 13 जानेवारी : विविध फीचर्स असलेले आणि सर्वसामान्याच्या आवाक्यातले निरनिराळे फोन MI लाँच करतो. यावेळी 2021 च्या अगदी सुरवातीलाच भारतात MI ने MI 10I लाँच केला. MI 10I अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि MI च्या ऑफिशिअल साईटवर ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. Xiaomi चे CEO मनू कुमार जैन (Manu Kumar Jain) यांनी ट्विट करून, MI ने पहिल्या सेलमध्येच 200 कोटींची कमाई केली असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी MI च्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
2️⃣0️⃣0️⃣ Crore
Super stoked to announce that the #108MP camera #Mi10i crossed ₹ #200Crore mark in the first sale!
Thank you all our incredible #MiFans & partners for showering the love on #ThePerfect10
MI 10i मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी (2400 x 1080 पिक्सल) रिजोल्यूशन डॉट डिस्प्ले आहे. स्क्रीनचा अडेप्टिव सिंक रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. फोनच्या सुरक्षेसाठी फ्रंट आणि बॅकवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. MI10I मध्ये पॅसिफिक सनराईज, अटलांटिक ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक हे 3रंग उपलब्ध आहेत.
शाओमीच्या MI 10I स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि एक्स 5 2 जी मॉडेम आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशनमुळे चर्चेत आलेल्या या स्मार्टफोनला चार बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. यात अपर्चर एफ/1.75 सह 108 मेगापिक्सल प्रायमरी (Samsung HM2) सेंसर, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसंच 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
MI 10I या फोनला 4820mAh बॅटरीसह बॉक्समध्ये 33 वॅटचा फास्ट चार्जर आहे. तसंच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल-स्टिरिओ स्पीकर्स, 3.5.mm मीमी हेडफोन जॅक, यूएसबी टाईप-सी पोर्ट, IR सेंसर आहे.
Xiaomi चा हा सुपर फीचर फोन घेण्यासाठी ग्राहकांना 6 जीबी रॅम 64 जीबीसाठी 20999 रुपये, 128 जीबी स्टोरेजसाठी 21,999 रुपये, तर 8 जीबी 128 जीबीसाठी 23,999 रुपये मोजावे लागणार आहे.