मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Samsung Mega Monsoon Sale: हा प्रीमियम 5G स्मार्टफोन झाला अत्यंत स्वस्त, मिळेल 8GB RAM आणि 120Hz चा डिस्प्ले

Samsung Mega Monsoon Sale: हा प्रीमियम 5G स्मार्टफोन झाला अत्यंत स्वस्त, मिळेल 8GB RAM आणि 120Hz चा डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5जी (Galaxy S20 FE 5G) हा स्मार्टफोनही सवलतीच्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5जी (Galaxy S20 FE 5G) हा स्मार्टफोनही सवलतीच्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5जी (Galaxy S20 FE 5G) हा स्मार्टफोनही सवलतीच्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

नवी दिल्ली, 10 जुलै: सॅमसंग कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर मेगा मान्सून डिलाइट सेलचं (Samsung Mega Monsoon Delight Sale) चं आयोजन केलं आहे. हा सेल 6 जुलै 2021 रोजी सुरू झाला असून, 11 जुलैपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग कंपनीचा फ्रीज, एसी, स्मार्ट टीव्ही आदी उपकरणं सवलतीच्या किमतीत खरेदी करणं शक्य आहे. त्याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5जी (Galaxy S20 FE 5G) हा स्मार्टफोनही सवलतीच्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

Samsung.com या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5जी हा स्मार्टफोन 47,999 रुपयांऐवजी 45,999 रुपयांत खरेदी करू शकतात. म्हणजेच थेट दोन हजार रुपयांची सवलत फोनवर देण्यात आली आहे. तसंच, ग्राहकांना जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा असेल, तर ती सुविधाही उपलब्ध असून, एक्स्चेंज ऑफरअंतर्गत 13,440 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवण्याची संधी ग्राहकांना आहे.

हे वाचा-WhatsApp वर टाईप न करताही पाठवू शकता मेसेज; जाणून घ्या या फीचरबद्दल

हा फॅन एडिशन फोन असून, त्याला क्वालकॉम 865 प्रोसेसर आहे. क्लाऊ नेव्ही, क्लाऊ मिंट आणि क्लाउट लवेंडर अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

या फोनमधील महत्त्वाचे फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G या स्मार्टफोनला 6.5 इंचांचा sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120hz आणि टच सॅम्पलिंग 240Hz आहे. गॅलेक्सी S20 FE या फोनमध्ये फिंगरप्रिंट आणि अन्य खुणा उमटू नयेत म्हणून टेक्स्चर हेज इफेक्ट देण्यात आला आहे. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. या फोनला 8GB RAM आणि 128GB स्टोरेज सुविधा आहे. आवश्यकतेनुसार याची स्टोरेज क्षमता तब्बल 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनला IP68 रेटिंग देण्यात आलं आहे. याचा अर्थ असा, की हा फोन डस्ट प्रूफ आणि वॉटर प्रूफ आहे.

हे वाचा-कोरोनातून बरं झाल्यानंतर हे Smartwatch ठरेल फायदेशीर; समस्यांविषयी देईल अलर्ट

Galaxy S20 FE 5G या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची झूम क्वालिटी अत्युत्तम आहे. यातल्या सिंगल टेक फीचरच्या साह्याने युझर एका क्लिकमध्ये 14 वेगवेगळ्या फॉरमॅटचे फोटो आणि व्हिडियो कॅप्चर करू शकतात. फोनच्या पाठीमागच्या बाजूला f/1.8 अॅपर्चरसह 12 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याशिवाय f/2.2 अॅपर्चरसह 12 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अॅपर्चरचा 8 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेराही देण्यात आला आहे.

32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा

या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे फोनच्या पुढच्या बाजूला सेल्फीकरिता तब्बल 32 मेगापिक्सेलचा आणि 60fps चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचं अॅपर्चर f/2.2 असून, त्याद्वारे 4K व्हिडिओ शूट करणंही शक्य आहे. या फोनला 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वायरलेस चार्जिंग 2.0चा सपोर्टही यात मिळतो.

First published:

Tags: Mobile Phone, Samsung, Tech news