मुंबई, 9 जुलै- सध्याच्या काळात सर्वांत ट्रेंडिग असलेली अॅप्स म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप(WhatsApp) आणि फेसबुक. यावर युझर्स मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. ही अॅप्स सातत्याने आपल्या युझर्सच्या सोयीसाठी काही नवनवीन फीचर्स आणत असतात. व्हॉट्सअॅपच्या अशाच एका वेगळ्या फीचरची(New Feature) आज आपण माहिती घेणार आहोत.
व्हॉट्सअॅप हे चॅटिंगसाठी वापरलं जाणारं लोकप्रिय अॅप आहे. आजच्या युगात बहुतांश जण त्याचा वापर करताना दिसतात; ऑफिसच्या कामापासून बिझनेस ऑर्डर्सपर्यंत आणि शाळेतल्या मित्रांपासून जुन्या ऑफिसमधल्या मित्रांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स असतात. एखाद्या विषयाला वाहिलेलेही ग्रुप (Group) असतात. कधी-कधी लांबलचक मेसेज पाठवायचा असतो; पण काही जणांना ते जमत नाही. कधी हाताची बोटं दुखतात, तर कधीकधी टायपिंगची सवय नसल्याने पटापट टाइप करता येत नाही. त्यावर सोपा उपाय म्हणून व्हॉट्सअॅपमध्ये एक फीचर आहे. काही जणांना ते कदाचित परिचयाचे असेलही व ते त्या फीचरचा पुरेपूर उपयोगही करत असतील; पण काही जणांना अजून त्याबद्दल माहिती नाही. या फीचरबद्दल 'झी न्यूज'ने माहिती दिली आहे.
(हे वाचा: मोठी बातमी! नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत WhatsApp नं घेतला मोठा निर्णय)
कसा करावा या फीचरचा वापर-
बोलून मेसेज पाठवण्यासाठी काही ठरावीक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये मेसेज पाठवायचा असेल, त्याच्या चॅटबॉक्सवर जावं. कीबोर्ड ओपन केल्यावर उजव्या बाजूला माइकचा आयकॉन दिसेल. कॅमेराच्या आयकॉनशेजारी जो माइक आयकॉन (Mic Icon) असतो, त्या माइकचा वापर करून तुमचा आवाज रेकॉर्ड (Recording) करून पाठवू शकता; पण आपण ज्याविषयी माहिती घेत आहोत, ते फीचर यापेक्षा वेगळं आहे. आपल्याला कीबोर्डवरचा माइक पाहायचा आहे. प्रत्येक मोबाइलचं सेटिंग वेगळं असल्याने हा माइक वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो. कीबोर्ड ओपन केल्यावर, कीबोर्डच्या वर सेटिंग्सच्या किंवा GIF आयकॉनच्या बाजूला हा माइक असतो.
(हे वाचा:WhatsApp Group वरून एखाद्याला प्रायव्हेट मेसेज किंवा रिप्लाय कसा करायचा? )
त्या माइकवर क्लिक केल्यावर तुम्हाला बोलायला सांगितलं जातं. तुम्ही जे बोलत जाल, तसतसा मेसेज बॉक्समध्ये (Message Typing by Voice) तुमचा मेसेज टाइप होत जातो. संपूर्ण मेसेज टाइप करून झाला, की तुम्ही तो पूर्ण वाचून तो सेंड करू शकता. त्यात काही चुकीचं टाइप झालं असेल तर सुधारणा करू शकता.
अशी फीचर्स व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट करतं व युझर्सना सुविधांचा लाभ देतं. एखाद्याला व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्या व्हिडिओचा आवाज म्युट करण्याचं फीचरदेखील अलीकडेच व्हॉट्सअॅपने सादर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology, WhatsApp features