मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Maxima Pro X6 Smartwatch लाँच, 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप; दिवसभरातील Activity ही होणार रेकॉर्ड

Maxima Pro X6 Smartwatch लाँच, 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप; दिवसभरातील Activity ही होणार रेकॉर्ड

Maxima कंपनीने Maxima Pro X6 ही धमाकेदार स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच Amazon आणि Flipkart वर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : फेस्टिव्ह सीजन सुरू असल्याने सध्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहेत. त्यातच आता Maxima कंपनीने Maxima Pro X6 ही धमाकेदार स्मार्टवॉच (Maxima Pro X6 smartwatch) लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच Amazon आणि Flipkart वर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. Maxima Pro X6 या smartwatch ची किंमत 3999 रूपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये वाटरप्रूफ (Maxima Pro X6 with 10 days battery backup) सुविधा आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

या स्मार्टवॉचमध्ये 1.7 इंची सुपर ब्राइट HD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्क्रीन ब्राइटनेस लेवलही 400 निट्स पर्यंत (Maxima Pro X6 smartwatch features ) देण्यात आली आहे. त्यामुळे कडक उन्हातही स्क्रिनवर युजर्सला वेळ पाहता येईल.

Redmi कंपनीच्या या दोन धमाकेदार SmartWatch झाल्या लॉन्च...पाहा फीचर्स

विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह इनबिल्ट माइक आणि हाय डेफिनिशन स्पीकरची सुविधाही देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचला सहजरित्या Da Fit App सोबत जोडता येणार असल्याने युजर्सला दुसऱ्या युजर्सशी कनेक्ट होता येईल.

तुमचा Laptop अचानक Hang होतोय? या ट्रिक्स वापरुन करा सुपरफास्ट

या स्मार्टवॉचमध्ये युजर्सच्या दिवसभरातील अ‍ॅक्टिविटीजचं रिकॉर्डिंगही करता येणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये AI स्लीप मॉनिटर आणि SpO2 कंटिन्यूअस हार्ट रेट मॉनिटरची सुविधा देण्यात आल्यामुळे युजर्सला आरोग्याचीही काळजी घेता येणार आहे. हे स्मार्टवॉच सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत आणि त्यात चांगले फीचर्स देण्यात आल्याने या स्मार्टवॉचची चर्चा आहे.

First published:

Tags: Smartwatch, Smartwatch features