Home /News /auto-and-tech /

Renault Cars वर 1.30 लाखांपर्यंतचा डिस्काउंट, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट

Renault Cars वर 1.30 लाखांपर्यंतचा डिस्काउंट, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट

रेनो इंडिया (Renault India) जानेवारी 2022 मध्ये आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. रेनोच्या वेगवेगळ्या मॉडेलवर ग्राहकांना 1.30 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.

  नवी दिल्ली, 15 जानेवारी : जर तुम्हीही स्वस्तात कार खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रेनो इंडिया (Renault India) जानेवारी 2022 मध्ये आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. रेनोच्या वेगवेगळ्या मॉडेलवर ग्राहकांना 1.30 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. कंपनीची ही ऑफर Renault Kwid, Renault Triber, Renault Kiger आणि Renault Duster सारखे बेस्ट सेलिंग मॉडेलवर आहे. कंपनीच्या या सूटमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि लॉयल्टी बेनिफिट्स सामिल आहेत. रेनोच्या कार्सवर ही ऑफर 31 जानेवारी 2022 पर्यंत बुकिंग आणि खरेदीवर लागू आहे.

  हे वाचा - Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

  Renault Duster - Renault Duster वर 1.30 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट बेनिफिट आहे. यात 50,000 रुपये एक्सचेंज बोनस, 50,000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 30,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. तर रुरल डिस्काउंट 15,000 रुपयांचा आहे. रुरल डिस्काउंट सरपंच, शेतकरी आणि ग्राम पंचायत सदस्यांवर लागू आहे. Renault Duster ची सुरुवातीची किंमत 9.86 लाख रुपये आहे. Renault Triber - Renault Triber 2021 मॉडेलवर 40,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. यात 10,000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 20,000 रुपये एक्सचेंज बोनस सामिल आहे. त्याशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. याची सुरुवातीची किंमत 5.69 लाख रुपये आहे. मॉडेल ईयर 2022 मॉडेलवर 30,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. यात 20,000 रुपये एक्सचेंज बोनस, 10,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे. Renault Kiger - Renault च्या कॉम्पॅक्ट SUV Kiger वर 10,000 रुपये लॉयल्टी बेनिफिट आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. यावर कॅश डिस्काउंट दिला गेला नाही. या कारची सुरुवातीची किंमत 5.79 लाख रुपये एक्स शोरुम आहे.

  हे वाचा - Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

  Renault Kwid - Renault Kwid 2021 मॉडेलवर 35,000 रुपयांचा डिस्काउंट आहे. या कारवर 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट आहे. हा एक्सचेंज डिस्काउंट 1.0 लीटर मॉडेलवर 15,000 रुपये आणि 0.8 लीटर मॉडेलवर 10,000 रुपये आहे. त्याशिवाय काही निवडक वेरिएंटवर 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Renault Kwid 2022 मॉडेलवर 30,000 रुपयांचा डिस्काउंट आहे. यात 5000 रुपये कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट, काही निवडक वेरिएंटवर 10 हजारांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.24 लाख रुपये आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या