मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ड्रायव्हिंगच्या वेळी Google Map वापरताय? वेळीच सावध व्हा, होईल हजारोंचा दंड

ड्रायव्हिंगच्या वेळी Google Map वापरताय? वेळीच सावध व्हा, होईल हजारोंचा दंड

 सध्याच्या काळात कुणालाही न विचारता कुठंही जाण्यासाठी मदत करणारा सोपा मित्र म्हणजे गूगल मॅप (Google Map). गूगल मॅपचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत.

सध्याच्या काळात कुणालाही न विचारता कुठंही जाण्यासाठी मदत करणारा सोपा मित्र म्हणजे गूगल मॅप (Google Map). गूगल मॅपचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत.

सध्याच्या काळात कुणालाही न विचारता कुठंही जाण्यासाठी मदत करणारा सोपा मित्र म्हणजे गूगल मॅप (Google Map). गूगल मॅपचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत.

मुंबई, 14 फेब्रुवारी : सध्याच्या काळात कुणालाही न विचारता कुठंही जाण्यासाठी मदत करणारा सोपा मित्र म्हणजे गूगल मॅप (Google Map). प्रवास करताना रस्ता दाखवणे, रस्त्यावरील ट्रॅफिकची परिस्थिती सांगणे तसंच अंतिम ठिकाणी पोहचण्यासाठी लागणारा वेळ सांगणे ही सर्व कामं गूगल मॅप करते. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या सर्वांचा तो एक हक्काचा मित्र झाला आहे. पण या मित्राशी अधिक सलगी तुम्हाला महाग पडू शकते.

खिशाला बसू शकतो फटका!

गूगल मॅपचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत. तुम्ही गाडीमधील डॅशबोर्डवर मोबाईल होल्डर लावलेला नसेल आणि हातामध्ये मोबाईल घेऊन गूगल मॅप वापरत असाल, तर ही सवय लगेच बंद करा. तुमची ही सवय वाहतुकीचा नियम मोडणारी आहे. त्यामुळे तुम्हाला वाहतुकीच्या नियमानुसार थोडा नाही तर तब्बल 5 हजारांचा दंड होऊ शकतो.

( वाचा : Alert! ATM कार्डबाबत फसवणुकीचा नवा प्रकार समोर; असं काही दिसल्यात त्वरित सावध व्हा )

दिल्लीमधील एका कार चालकाला (Car Driver) काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी दंड केला होता. आपण गाडी चालवत असताना कुणाशी बोलत नव्हतो, असा युक्तीवाद कारचालकानं केला होता. त्यावर मोबाईल होल्डरशिवाय हातामध्ये मोबाईल घेऊन गूगल मॅपचा वापर केल्यानं हा दंड लावण्यात आल्याचं दिल्ली वाहतूक पोलिसांनी (Delhi Traffic Police) स्पष्ट केले. या प्रकारच्या कृतीमुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे याचा निष्काळजी ड्रायव्हिंगमध्ये समावेश होतो, असं पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.

तुम्ही गाडी चालवत असताना गूगल मॅप वापरत असाल तर आजच गाडीमध्ये मोबाईल होल्डर बसवा. बाईकवरील मोबाईल होल्डरची किंमत 200 रुपये तर चार चाकी गाडीसाठी मोबाईल होल्डरची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही ही रक्कम एकदाच खर्च करुन भविष्यातील पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई टाळू शकता.

First published:

Tags: Google