मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Car मध्ये Hand Sanitizer ठेवणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या काय आहे जाणकारांचं म्हणणं

Car मध्ये Hand Sanitizer ठेवणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या काय आहे जाणकारांचं म्हणणं

हात धुण्यासाठी साबण किंवा पाणी उपलब्ध नसल्यास, हातावरील जीव-जंतू मारण्यासाठी हँड सॅनिटाईजर (Hand Sanitizer) चांगला पर्याय आहे. परंतु हँड सॅनिटाईजरमध्ये 60 टक्के अल्कोहल असल्यास हा पर्याय चांगला मानला जातो.

हात धुण्यासाठी साबण किंवा पाणी उपलब्ध नसल्यास, हातावरील जीव-जंतू मारण्यासाठी हँड सॅनिटाईजर (Hand Sanitizer) चांगला पर्याय आहे. परंतु हँड सॅनिटाईजरमध्ये 60 टक्के अल्कोहल असल्यास हा पर्याय चांगला मानला जातो.

हात धुण्यासाठी साबण किंवा पाणी उपलब्ध नसल्यास, हातावरील जीव-जंतू मारण्यासाठी हँड सॅनिटाईजर (Hand Sanitizer) चांगला पर्याय आहे. परंतु हँड सॅनिटाईजरमध्ये 60 टक्के अल्कोहल असल्यास हा पर्याय चांगला मानला जातो.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अशात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणं, सतत हात धुण्याचा, सॅनिटाईज करण्याचा सल्ला दिला जात आहे. हात धुण्यासाठी साबण किंवा पाणी उपलब्ध नसल्यास, हातावरील जीव-जंतू मारण्यासाठी हँड सॅनिटाईजर (Hand Sanitizer) चांगला पर्याय आहे. परंतु हँड सॅनिटाईजरमध्ये 60 टक्के अल्कोहल असल्यास हा पर्याय चांगला मानला जातो. सॅनिटाईजरच्या बॉटलचं झाकण योग्यरित्या न लावल्यास, यात असलेलं अल्कोहल काही वेळानंतर लुप्त होतं. सॅनिटाईजर कारमध्ये तात्पुरत्या स्वरुपात ठेवलं जाऊ शकतं.

कारमध्ये हँड सॅनिटाईजर ठेवणं सुरक्षित आहे का?

कॅलिफोर्निया सॅन डिएगोतील एनेस्थिसियोलॉजी विद्यापीठ आणि ASAP IV चे संस्थापक टेलर ग्रेबर यांनी सांगितलं की, कारमध्ये हँड सॅनिटाईजर ठेवणं सुरक्षित आहे. हँड सॅनिटाईजरवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यानंतर सॅनिटाईजरमधील अल्कोहल कमी होतं आणि त्याचा प्रभाव कमी होत जातो.

(वाचा - आता डेबिट कार्डची गरज नाही,UPIद्वारे QR कोड स्कॅन करुन ATM मधून काढता येणार पैसे)

गाडीत ठेवलेल्या सॅनिटाईजर बॉटलचं झाकण खुलं असेल किंवा नीट लावलेलं नसेल, तर गाडीमध्ये असलेल्या हाय टेम्प्रेचरमुळे यात असलेलं अल्कोहल लवकर उडू लागतं. ग्रेबर यांनी सांगितलं की, घरी बनवलेल्या सॅनिटाईजरमध्ये अल्कोहलचं प्रमाण अतिशय कमी असतं. होम मेड सॅनिटाईजरमध्ये हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर केलेला असतो. जर हायड्रोजन पेरोक्साईडयुक्त सॅनिटाईजरला UV light अर्थात उन्हात ठेवलं गेलं, तर त्याच पाण्यात रुपांतर होतं.

हिट सॅनिटाईजरला कसं प्रभावित करते?

अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, (Food and Drug Administration) सॅनिटाईजरला 59 ते 86 डिग्री fahrenheit temperature वर स्टोर केलं गेलं पाहिजे. हे थंड किंवा गरम तापमानामध्येही प्रभावी ठरतं, परंतु 104 डिग्री fahrenheit temperature हून कमीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जावा. 104 डिग्री fahrenheit temperature वर जर सॅनिटाईजरला ठेवलं गेलं, तर यात अल्कोहल लुप्त होण्याचा धोका असतो. उन्हात गाडी लवकर गरम होते, त्यामुळे सॅनिटाईजर थंड वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

First published:

Tags: Car, Sanitizer