नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: डिजीटल जगात अनेक लोकांचा वेळ स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरच जातो. स्मार्टफोनशिवाय अनेक कामं रखडतात. बँकेसंबंधी कामं, शॉपिंग, ऑनलाइन पेमेंट, मीटिंग्स अशी अनेक कामं ऑनलाइन घरबसल्या केली जातात. लोकांचं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणं, याचाच फायदा सायबर फ्रॉडस्टर्स घेतला जात आहेत. इंटरनेटवर (Internet) अनेक फेक-बनावट सॉफ्टवेअर आणि Apps (Fake Apps and Software) आहेत. जे एका सेकंदात केवळ तुमची माहिती चोरी करत नाहीत, तर बँक अकाउंटही खाली करतात.
कधी लॉटरीच्या नावे, तर कधी कामासंबंधीची कारणं देत सायबर क्रिमिनल्स (Cyber Crime) तुमच्या खात्यात चोरी करण्याचा प्रयत्न करतात. सायबर क्रिमिनल्स नव्या पद्धतींचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत. एक असाच प्रकार मालवेअरचा (Malware) आहे. या मालवेअरच्या मदतीने तुमच्या सिस्टममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मालवेअर अटॅक -
मालवेअरचा कोणत्याही सिस्टममध्ये स्टोर केलेली माहिती अॅक्सेस करण्यासाठी वापर केला जातो. मालवेअर अनेक प्रकारचे असतात. काही मालवेअरच्या मदतीने क्रेडिट कार्ड नंबर, आयडी किंवा कंप्यूटरद्वारे पर्सनल माहिती लीक केली जाऊ शकते. काही मालवेअर संपूर्ण सिस्टम टेकओवर करुन त्याला दुसऱ्या सिस्टमशी जोडतात. काही मालवेअरचा उपयोग कंप्यूटर डेटा खराब करण्यासाठी केला जातो.
मालवेअरपासून कसा कराल बचाव?
गाणी, पिक्चर किंवा कोणताही प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी केवळ विश्वासार्ह वेबसाइटचा वापर करा. यासाठी काही पेमेंट करावं लागलं तरी अशा वेबसाइट सुरक्षित असतात. यामुळे तुमचा लॅपटॉप, कंप्यूटर सिस्टम सुरक्षित राहील. तसंच ऑनलाइन शॉपिंग करताना केवळ पॉप्युलर, ऑथेंटिक साइटवरुनच शॉपिंग करा.
जर तुमच्या सिस्टममध्ये अँटी मालवेअर किंवा अँटी व्हायरस नसेल, तर तो लगेच इन्स्टॉल करा. सिस्टममध्ये अँटी व्हायरस वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे. काही अँटी व्हायरस ईमेल किंवा वेब प्रमोशनद्वारे अटॅचमेंटद्वारे आलेले असतात. ते इन्स्टॉल करू नका. चांगल्या कंपनीचे अँटी व्हायरस खरेदी करणं फायद्याचं ठरेल.
महत्त्वपूर्ण डेटा पासवर्डने (Password) सुरक्षित ठेवा. पासवर्डदेखील स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे. यात अंक, अक्षरं, कॅरेक्टर्सचा समावेश असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Malware, Online fraud, Tech news