Home /News /technology /

Internet Speed खूपच आहे स्लो? चांगल्या स्पीडसाठी अशी बदला तुमच्या स्मार्टफोनचं सेटिंग

Internet Speed खूपच आहे स्लो? चांगल्या स्पीडसाठी अशी बदला तुमच्या स्मार्टफोनचं सेटिंग

सोशल मीडियाकडं लोकांचा कल वाढल्यामुळे हायस्पीड इंटरनेटची (High-speed Internet) मागणी वाढली आहे. इंटरनेटचा स्पीड आपल्या हातात नाही, हे सर्वांना माहितीच असेल. पण, अशा काही ट्रिक्स आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता

पुढे वाचा ...
मुंबई, 12 फेब्रुवारी: सध्या माहिती व तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा (Social Media) बोलबाला आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साईटवर आपलं अकाउंट असेलच. काही जणांना तर सोशल मीडियाची इतकी आवड आहे की, दिवसभरात आपण काय-काय केलं याचेदेखील अपडेट्स ते सोशल मीडियावर देतात. सोशल मीडियाशिवाय विविध अ‍ॅप्स आणि ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सचीदेखील (Online Streaming) सध्या चलती आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाईन स्ट्रिमिंगमध्ये एक कॉमन दुवा आहे, तो म्हणजे इंटरनेट (Internet Use). सोशल मीडिया असो किंवा ऑनलाईन स्ट्रिमिंग दोन्ही गोष्टी वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन मस्ट आहे. फक्त इंटरनेट असूनही उपयोग नाही तर त्याला पुरेसा स्पीड असणंही आवश्यक असतं. साधा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (WhatsApp Message) किंवा कॉलसाठीही योग्य इंटरनेट स्पीडची (Internet Speed) आवश्यकता असते. अशा स्थितीत जर इंटरनेटचा स्लो असेल तर आपली कामं खोळंबतात. एकूणच, सोशल मीडियाकडं लोकांचा कल वाढल्यामुळे हायस्पीड इंटरनेटची (High-speed Internet) मागणी वाढली आहे. इंटरनेटचा स्पीड आपल्या हातात नाही, हे सर्वांना माहितीच असेल. पण, अशा काही ट्रिक्स आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. या ट्रिक्स केवळ डिव्हाइस किंवा नेटवर्कसाठीच उपयुक्त ठरतात. हे वाचा-Netflix वर ब्लॉक शो आणि चित्रपट सहज पाहता येतील, या टिप्स फोलो करा कधीकधी तुमचं इंटरनेट स्लो असण्याचं कारण तुमचा डिव्हाइस असतो. कारण, स्मार्टफोन (Smartphone) कमी बँडविड्थ नेटवर्क (Bandwidth network) पकडतो, त्यामुळे तुम्हाला स्लो इंटरनेट मिळतं. ही समस्या 3G आणि 4G दोन्ही नेटवर्कवर जाणवते. तुम्ही हाय बँडविड्थ इंटरनेटवर स्विच करून इंटरनेटचा वेग वाढवू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. स्टेप-1: सर्वात अगोदर आपल्या स्मार्टफोन सेटिंग्जमध्ये जा. स्टेप-2: त्याठिकाणी मोबाइल नेटवर्क हा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. स्टेप-3: त्यानंतर तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरवर जा आणि Network ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-4: त्याठिकाणी असलेल्या Select Automatically ऑप्शनवर क्लिक करून तो टर्न ऑफ करा. स्टेप-5: असं केल्यानंतर तुम्हाला मॅन्युअली तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर शोधून त्यावर टॅप करावं लागेल. सेटिंग्जमध्ये वरील सर्व बदल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करावा लागेल. फोन रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा मोबाईल इंटरनेट स्पीड वाढला आहे. हे वाचा-सावधान! WhatsApp तुम्हाला आजारी पाडतोय; या समस्यांना बळी पडतायेत लोक तुम्ही फोनवर 4G किंवा LTE नेटवर्क सेट करू शकता 4G किंवा LTE नेटवर्क निवडण्यासाठी, सुरुवातीला फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. या ठिकाणी कनेक्शनचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर SIM Card Manager चा ऑप्शन ओपन होईल. तिथे मोबाईल डेटा किंवा मोबाईल नेटवर्कवर क्लिक करा. त्यानंतर LTE/3G/2G (Auto Connect) चे ऑप्शन्स दिसतील त्यातला एक सिलेक्ट करा. काहीवेळा इंटरनेट स्लो होण्याचं कारण तुमचा मोबाईल फोन किंवा नेटवर्क नसतं. तुम्ही ज्या ठिकाणी स्मार्टफोन वापरत आहात ती जागासुद्धा (Place) स्लो नेटवर्कसाठी कारणीभूत असू शकते. काही ठिकाणी ऑपरेटरच्या टॉवरची (Operator Towers) संख्या कमी आणि ट्रॅफिक (Traffic) जास्त असतं. अशा ठिकाणी स्लो इंटरनेट स्पीडची समस्या जाणवते. अशा समस्यांवर ट्रिक्स कामी येणार नाहीत.
First published:

Tags: High speed internet, Internet, Internet use

पुढील बातम्या