मुंबई, 10 ऑक्टोबर : प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. बोलेरो पिकअप रेंज या गाडीसह (Bolero Pick-up Range) मोफत कोरोना व्हायरस विमा (coronavirus insurance) देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत या गाडीची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला आणि त्यांच्या कुटुंबातील (दोन मुलांपर्यंत) सदस्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर देण्यात येणार आहे.
हे वाचा - Instagram Reels चं नवं अपडेट; टिकटॉकला आता विसरून जाल असं कमाल फिचर
ऑफर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या विमा योजनेचा लाभ ग्राहक 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान बोलेरो पिकअप रेंज या गाडीच्या खरेदीवर घेऊ शकतात. या रेंजमध्ये पिकअप मॅक्सी ट्रक (Mahindra Bolero Maxitruck), सिटी पिकअप
(Mahindra Bolero City Pikup) आणि कँपर (mahindra camper) गाड्यांचा समावेश आहे. नवीन गाडी खरेदी केल्याच्या 9.5 महिन्यांपर्यंत इन्शुरन्स कव्हर वैध राहणार आहे. कंपनीने या विमा योजनेसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसह करार केला आहे.
हे वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!
महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतेंद्र सिंह बाजवा यांनी सांगितलं की, पिकअप ग्राहकांना सतत प्रवास करावा लागतो आणि त्यांना आसपासच्या लोकांशी संवाद साधावा लागतो. त्यामुळे त्यांना ही विमा योजना दिली जात आहे.
हे वाचा - सणासुदीच्या काळात Hyundai कडून जबरदस्त डिस्काउंट्स
पुढील 18 महिन्यात लॉन्च करणार या कार -
महिंद्राने देशात एक मोठा टप्पा पार केला आहे आणि ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रियाही मिळवल्या आहेत. नुकतीच कंपनीने एसयूव्ही महिंद्रा थार 2020 लॉन्च केली होती, ज्याची सुरुवातीची किंमत 9.8 लाख आणि टॉप मॉडेल किंमत 12.95 लाख रुपये आहे. कंपनी भविष्यात कारची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. गाडीवाडी डॉट कॉमनुसार, कंपनी येत्या 18 महिन्यात बाजारात एकूण 9 नव्या कार सादर करणार आहे.
New-gen Scorpio
New-gen XUV500
BS6 TUV300 Facelift
BS6 TUV300 Plus Facelift
XUV300 Electric
e-KUV100
5-door Thar
New micro-SUV
Ford-Mahindra Creta Rivaling SUV
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india